शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अबब... गोदामातून दीड कोटींचा धान गायब; सालेकसा साेसायटीतील १५ जणांवर गुन्हा

By नरेश रहिले | Updated: October 14, 2022 16:04 IST

Gondia Paddy : तब्बल ८००० क्विंटल धानाचा पत्ताच नाही

गोंदिया : शेतकऱ्यांच्या हक्काचे धान घेतांना शेतकऱ्यांना लुबाडणे व शासनालाही लुटणे ह्या दोन्ही गोष्टी एकाच सोबत करणाऱ्या सालेकसा येथील समृद्ध किसान शेती उद्योग साधन सामग्री पुरवठा व खरेदी विक्री सेवा सहकारी संस्था मर्यादीत सालेकसा, नोंदणी क्रंमाक १०७० च्या अध्यक्ष, सचिवासह १५ संचालक मंडळावर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी (४९) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

समृद्ध किसान संस्था सालेकसा या संस्थेने पणन महासंघासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी निर्गमीत करण्यात येणाऱ्या नियम व अटीच्या अधिन राहून धान खरेदी करायची होती. पणन हंगाम २०२१-२२ मध्ये या संस्थेने शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी येते. खरेदी केलेला धान पणन महासंघाच्या देण्यात आलेल्या डिओप्रमाणे भरडाई करण्याकरीता मिलधारकांना धानाची उचल देणे बंधनकारक आहे. परंतु दिलेल्या डिओप्रमाणे समृद्ध किसान संस्था, सालेकसा यांनी मिलर्सना धान उचल दिला नाही. डिओ दिलेले मिलर्स यांनी धान उचल देत नसल्याबाबत जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांचेकडे लेखी तक्रार दिल्या आहेत.

समृद्ध किसान संस्थेस वेळोवेळी धान उचल देण्याकरीता नोटीस देण्यात आल्या. मात्र, संस्थेकडून नोटीसचे उत्तर देण्यात आले नाही व धान उचलही देण्यात आलेले नाही. यामुळे संस्थेच्या गोदामांमध्ये धान साठ्याची पाहणी करण्याकरीता १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ दरम्यान मार्केटींग अधिकारी मनाजे बाजपाई, सहायक निबंधक, सालेकसा, श्रेणी- १ संजय गायधने, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय यशवंत देशमुख, ज्ञानदेव तनपुरे, हरीष चेटुले पाहणी करण्यास गेले. यावेळी समृद्ध किसान संस्थेने भाड्याने घेतलेल्या साकरीटोला येथील उर्मिला दोनोडे यांच्या मालकीचे गोदाम व रोंढा येथील अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या गोदामातून तब्बल ८००० क्विंटल धान गायब होते. त्या धानाची किंमत १ कोटी ५५ लाख २० हजार रुपये सांगितले जाते.

हंगाम २०२१-२२ मधील धानाची केली अफरातफर

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमीटेड सोबत समृद्ध किसान संस्था सालेकसा या संस्थेने पणन महासंघासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी निर्गमीत करण्यात येणाऱ्या नियम व अटीच्या अधिन राहुन धान खरेदीचे कार्य करायचे होते. परंतु तसे न करता पणन हंगाम २०२१-२२ मध्ये सदर संस्थेने शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी येते. व खरेदी केलेला धान पणन महासंघाच्या देण्यात आलेल्या डिओप्रमाणे भरडाई करण्याकरीता मिल धारकांना धानाची उचल देणे बंधनकारक असतांना डिओप्रमाणे धान समृद्ध किसान संस्था, सालेकसा यांनी मिलर्सना दिलेच नाही. गोदामात धान शिल्लकच नव्हते.

आरोपीत यांचा समावेश

वासुदेव महादेव चुटे रा. आमगाव खुर्द, सालेकसा, भोजलाल अंतुलाल बघेले, रा.घोंशी, घनश्याम बहेकार रा. ईसनाटोला, रोशनलाल वसंतराव राणे रा.लोहारा, प्रेमलाल तुरकर, घनश्याम नागपुरे रा.मुंडीपार, राजेंद्र बहेकार रा.बोदलबोडी, खेमराज उपराडे रा.मुंडीपार, दालचंद मोहारे रा.गोवारीटोला, ग्यानीराम नोणारे रा. भजेपार, उमेश लहु वलथरे, मु.पो.गिरोला, वंदना अंबादे, रा. आमगाव खुर्द, लिला धुर्वे, रा. जमाकुडो, व्यवस्थापक जगदीश खोब्रागडे, रा.सालेकसा, ग्रेडर अजय भरत फुंडे, रा. आमगाव खुर्द यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीgondiya-acगोंदियाAgriculture Sectorशेती क्षेत्र