शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात गोंदियाच सर्वात 'थंड'; थंडीचा जोर वाढू लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:31 IST

Gondia : किमान तापमान १३.२ अंशांवर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जरी तापलेले आहे. मात्र वातावरणात पारा घसरला असून थंडीचा जोर वाढू लागला आहे. मंगळवारी (दि. १९) जिल्ह्याचे कमाल तापमान २९.२ तर किमान तापमान १३.२ अंशांवर आले होते. विदर्भातगोंदियाच सर्वांत 'कूल' ठरला.

यंदा दिवाळी आटोपूनसुद्धा थंडी जाणवत नव्हती. यामुळे यंदा वातावरणाचा अंदाज समजून येत नव्हता व त्यामुळे आतापर्यंत गरम कापडांची गरज भासली नाही. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून थंडीने एन्ट्री मारली असून आता हिवाळ्याला सुरुवात झाल्याचा अनुभव येऊ लागला आहे. 

अशातच मंगळवारी (दि. १९) जिल्ह्याचे कमाल तापमान २९.२ अंशावर तर किमान तापमान १३.२ अंशांवर आले होते. विशेष म्हणजे, विदर्भात गोंदियाचेच तापमान सर्वात कमी असून गोंदियाच 'कूल' ठरला आहे. आता थंडीचा जोर वाढू लागल्याने नागरिकांना सकाळी व रात्री गरम कापडांचा आधार घ्यावा लागत आहे. तर ग्रामीण भागात थंडीचा जोर जास्त राहत आहे. यामुळे लवकरच शुकशुकाट होताना दिसत आहे. गुलाबी थंडी सुरू झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून जिल्हावासी आनंद घेत आहे.

शेकोटीवर सुरू आहेत निवडणुकीच्या चर्चा ग्रामीण भागात थंडीचा जोर जास्त राहत असल्याने काही भागात शेकोटी पेटू लागली आहे. विशेष म्हणजे, ही शेकोटी अंगासह राजकीय वातावरणही तापवू लागली आहे. शेकोटीच्या अवती- भवती नागरिक बसून आग तापत निवडणुकीचे वेगवेगळे समीकरण व चर्चा करण्यात रंगलेले दिसून येत आहेत. 

विदर्भातील प्रमुख पाच ठिकाणचे किमान तापमानगोंदिया - १३.२ नागपूर - १३.५ब्रह्मपुरी- १४.२ गडचिरोली- १४.४ अमरावती-चंद्रपूर- १४.६

टॅग्स :gondiya-acगोंदियाWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीVidarbhaविदर्भ