- नरेश रहिलेगोंदिया - रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत मरार टोली परिसरातील मुख्य बसस्थानक येथे २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या दरम्यान आकाश अशोक कुंभलकर (२३, रा. केसलवाडा, तिरोडा) हा तरुण देवी दर्शनाकरिता डोंगरगड येथे गेला होता. येथील बसस्थानकावर गावाला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपी जय सुनील करियार (४०, रा. बजाज वाॅर्ड) याने त्याच्या खिशात हात टाकून १७ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे काढताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७९,५११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार फुलबांधे करीत आहेत.
Gondia: बस स्टँडवर खिशात हात घातला, रंगेहाथ पकडला
By नरेश रहिले | Updated: October 22, 2023 21:13 IST