शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

गोंदिया आगाराला दिवाळी चांगलीच पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:16 IST

प्रवासी सुविधा हे ब्रिद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला यंदाची दिवाळी चांगलीच पावल्याचे दिसून येत आहे. ४ ते २३ नोव्हेंबर या २० दिवसांच्या काळात गोंदिया आगाराला चक्क १ कोटी ९२ लाख १६ हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देआगाराला १.९२ कोटींचे उत्पन्न : २० दिवसांचा काळ भरभराटीचा

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रवासी सुविधा हे ब्रिद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला यंदाची दिवाळी चांगलीच पावल्याचे दिसून येत आहे. ४ ते २३ नोव्हेंबर या २० दिवसांच्या काळात गोंदिया आगाराला चक्क १ कोटी ९२ लाख १६ हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, आगाराने प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष फेऱ्यांचीही व्यवस्था केली होती व त्याला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे हे फलीत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.‘कशाला करता विषाची परीक्षा, एसटी बरी खाजगी पेक्षा’ ही म्हण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लाल रंगाच्या एसटीसाठी पूर्ण विश्वासाने वापरली जाते. या म्हणीवरून नागरिकांचा एसटीवरील दृढ विश्वास छळकतो. म्हणीनुसारच अधिकाधिक नागरीक एसटीने प्रवास करतात. यात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी अत्यंत महत्वाची ठरली आहे.नागरिकांच्या एसटीवरील विश्वासामुळेच महामंडळाकडून प्रवासी सुविधा ब्रिद धरूनच अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज प्रवासाच्या सोयीत वाढ झालेली असतानाही लाल रंगाची एसटी तीच शान घेवून धावताना दिसते.विशेष म्हणजे, एसटी वरील प्रवाशांचा विश्वास व त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांचे फलीतही मिळत असून याचे मुर्त उदाहरण गोंदिया आगाराने दाखवून दिले आहे.यंदाची दिवाळी गोंदिया आगाराला चांगलीच भरभराटीची ठरली असून दिवाळीच्या काळात आगाराने १ कोटी ९२ लाख १६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ४ ते २३ नोव्हेंबर या २० दिवसांच्या काळातील उत्पन्नाचा हा आकडा आहे.विशेष म्हणजे, आगाराने दिवाळीच्या सुट्या बघता प्रवाशांच्या सुविधेसाठी बसफेºया वाढवून दिल्या होत्या. त्यामुळे अन्य दिवसांत १७-१८ हजार असलेली प्रवासी संख्या २०-२२ हजारांवर पोहचली होती. मात्र आता दिवाळीचा काळ संपल्याने २४ तारखेपासून या वाढीव बसफेºया बंद करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांनीही त्यांना दिलेल्या सुविधांचा मोबदला १ कोटी ९२ लाख १६ हजार रूपयांच्या उत्पन्नातून आगाराला दिला असल्याचे दिसते.खासगी प्रवासी वाहन एसटीच्या मानगुटीवरएसटीचा प्रवास सुरक्षित व सुखकर असतानाच खासगी प्रवासी वाहन मात्र आता एसटीच्या मानगुटीवर बसत असल्याचे दिसत आहे. आजघडीला एसटी बसेसच्या तुलनेत खाजगी बसेस, आॅटो व काळीपिवळींची संख्या वाढली आहे. खाजगी प्रवासी वाहनचालक प्रवासी मिळविण्यासाठी एसटीच्या वेळेपुर्वी पोहचतात. तसेच पाहिजे तेवढ्या फेऱ्या ते मारू शकतात. मात्र एसटीला नियमांत राहून धावावे लागत असल्याने खासगी प्रवासी वाहनांत बसून प्रवासी निघून जातात. याचा फटका महामंडळाला बसत आहे.