शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

गोंदियाला मिळणार ३१ आॅटो टिप्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:11 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून गोंदिया नगर परिषदेला ३१ आॅटो टिप्पर, एक जेसीबी तसेच अन्य साहित्यांची भेट दिली जाणार आहे. याबाबत २ आॅगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने प्रकल्प अहवालास (डिपीआर) मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देशहर स्वच्छतेसाठी भेट : राज्य शासनाने दिली मंजुरी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून गोंदिया नगर परिषदेला ३१ आॅटो टिप्पर, एक जेसीबी तसेच अन्य साहित्यांची भेट दिली जाणार आहे. याबाबत २ आॅगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने प्रकल्प अहवालास (डिपीआर) मंजुरी दिली आहे. आता हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यावर साहित्यांसाठी सुमारे ७.५० कोटींचा निधी दिला जाणार आहे. राज्यातील सर्वच नगर परिषदांना एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आहे. असे झाल्यास नक्कीच शहरातील कचऱ्याची समस्या सुटणार आहे.प्रत्येकाला स्वच्छ व शुद्ध वातावरणात श्वास घेता यावा यासाठी शासनाकडून स्वच्छ भारत मिशन हे अभियान राबविले जात आहे. आता हे अभियान चळवळीत परिवर्तीत होत असून देशातील शहरच काय गावांनाही कचरामुक्त करण्यासाठी शासनाची धडपड सुरू आहे. यासाठी शासनाकडून कचरामुक्तीसाठी आवश्यक साधन-सामुग्रींबाबत अभ्यास करून संबंधीत यंत्रणेला त्याची पुर्तता केली जात आहे. त्यानुसार, सफाईसाठी लागणाऱ्या साहित्यांची पुर्तता करून नगर परिषदेला सज्ज करण्याचे प्रयत्न शासनाकडून केले जात आहे.यांतर्गत गोंदिया नगर परिषदेला ३१ आॅटो टिप्पर, एक जेसीबी मशीन, एक बायो गॅस मशिन व १२२ हातगाड्यांसाठी निधी दिला जाणार आहे. याबाबतच्या प्रकल्प अहवालास राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून २ आॅगस्टो रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तर आता हा अहवाल केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.केंद्र शासनाची मंजुरी मिळताच साहित्य खरेदीसाठी नगर परिषदेला सुमारे ७.५० कोटींचा निधी दिला जाणार आहे. यात राज्य व केंद्र शासनासह १४ व्या वित्त आयोगातून निधी दिला जाईल व त्यातून नगर परिषदेला साहित्यांची खरेदी करावयाची आहे.विशेष शेड तयार केले जाईलया प्रकल्पांतर्गत ओला व सुका कचरा तसेच चिखलयुक्त कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष शेड तयार केले जाणार आहे. यातील ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार केली जाईल. सुका कचरा रिसायकल करून त्याची विक्री करण्याची नगर परिषदेची संकल्पना आहे. असे झाल्यास या कचºयातून नगर परिषदेला आर्थिक उत्पन्न होणार. तर चिखलयुक्त कचऱ्यासाठी जमिनीच्या आत टँक तयार करून त्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती आहे.असा होणार वाहनांचा वापरमिळणाऱ्या ३१ आॅटो टिप्पर मधील २१ टिप्पर दररोज घरोघरी जावून कचरा गोळा करणार आहेत. आठ टिप्पर हॉटेल व लॉन सारख्या ठिकाणांवरून कचरा गोळा करतील. तर नगर परिषदेकडे असलेले दोन व नवे दोन टिप्पर चिखलयुक्त कचरा गोळा करण्यासाठी वापरले जाणार आहेत.सुमारे २८ लाख रूपये जेसीबी मशीनसाठी दिले जाणार असून याद्वारे शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई, संकलीत कचऱ्याची उचल व आवश्यकतेनुसार अन्य कामे केली जाईल.सुमारे १.९० कोटी रूपयांची बायो गॅस मशीन प्रकल्पात असून यात ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार केली जाणार आहे. म्हणजेच, ओल्या कचऱ्याची विल्हेवाट या मशीनद्वारे लावली जाईल.१२२ हातगाड्या यांतर्गत खरेदी करावयाच्या असून रस्त्यांवरील कचरा, माती आदिंची उचल यात केली जाईल. म्हणजेच, वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीची समस्या सुटणार आहे.