शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

गोंदिया जिल्ह्याच्या व्याघ्रप्रकल्पातील पाणवठे पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 5:50 PM

मागील महिनाभरापासून नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवन्यप्राण्यांची गावाकडे भटकंतीअपघातांच्या संख्येत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील महिनाभरापासून नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असल्याची माहिती आहे. मात्र या प्रकारामुळे वन्यप्राणी धोक्यात आल्याचे चित्र आहे.सडक-अर्जुनी तालुक्याला लागूनच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सिमा लागून आहे. तालुक्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आहे. हा राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. मागील १५ दिवसांपूर्वी तीन विविध घटनेत वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला. व्याघ्र प्रकल्पाला लागून देवपायली बाम्हणी, डोंगरगाव-डेपो, डुग्गीपार, कोहमारा, बकी, मेंडकी, कोसबी, चिखली, कोलारगाव, कोसमघाट, मनेरी, कनेरी, खोबा, कोकणा-जमी, परसोडी, गोंडीखोबा, मोगरा, मंदीटोला, खडकीटोला, मुगानझोखा ही गावे व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी उन्हाळ्यात दिवसात पाण्याचा शोधात गावाकडे कुच करतात. दरम्यान बरचदा रस्ता पार करताना वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. मागील तीन महिन्यात जवळपास दहा ते बारा वन्यप्राण्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले कोरडे पडले आहे. जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे वन्यजीव प्रेमीनी लोकमतशी बोलताना सांगितले.नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तीन वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत.त्यात डोंगरगाव, बोंडे, नवेगावबांध हे आहेत. डोंगरगाव वनपरिक्षेत्रात ७ बिट आहेत. तर बोडे वनपरिक्षेत्रात ८ बिट आहेत. नवेगाव वनपरिक्षेत्रात ४ वनक्षेत्र सहाय्यक आहेत. त्यात कोकणा, कोसबी, निशानी, पवनी हे आहेत. नवेगाव वन परिक्षेत्रात १३ हजार हेक्टर आर क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. तर पर्यटकांना वनात वनभ्रमंती करण्यासाठी बकी, खोली व जांभळी गेट आहे. या गेटवरुन पर्यटकांना आत व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी खुला केला आहे. नवेगाव येथे १३ बिटांची निर्मिती केली आहे.

शिकारीच्या घटनांमध्ये वाढप्राण्यांना पाणी पिण्यासाठी डोंगरगाव वनपरिक्षेत्रात १२ बोअरवेल आहेत. तर बोंडे वन परिक्षेत्रात ११ बोअरवेल आहेत. या बोअरवेलसह नैसर्गिक झरे आहेत.यावर्षी पाण्याचे दुर्भीक्ष असल्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक झरे कोरडे पडल्याचे चित्र आहे. वन्य प्राण्यांना पुरेस पाणी मिळत नसल्याने ते गावाच्या दिशेने कुच करित आहे. तर याचा फायदा शिकारी घेत असल्याचे चित्र आहे. वन्यजीव विभागाने जास्तीत-जास्त सौर उर्जेवर सोलरपंप बसवून प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्याची गरज आहे.

या परिसरात वन्य प्राण्याचा वावरदोन वर्षांपूर्वी व्याघ्र प्रकल्पातील काळीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी या गावांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढून त्यांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली. या भागात निलगाय, हरिण आदी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो असे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.आगीच्या घटनांमध्ये वाढया परिसरातील जंगलामध्ये तेंदूपत्त्याचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी तेंदूपत्ता हंगामा दरम्यान तेंदू हंगाम चांगला येण्यासाठी तेंदूपत्ता कंत्राटदार जंगलात आग लावतात. यंदा देखील या परिसरातील जंगलात आग लावल्यामुळे शेकडो हेक्टरमधील वनसंपदेचे नुकसान झाले. शिवाय त्याची झळ वन्य प्राण्यांना बसली. दिवसेंदिवस जंगलातील आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य