शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

बारावीच्या निकालात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल

By अंकुश गुंडावार | Updated: May 5, 2025 14:48 IST

मुलीच ठरल्या सरस : जिल्ह्यात तिरोडा टॉप

गोंदिया : माध्यमीक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी (दि.५) जाहीर झाला. यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी अव्वल ठरला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९५.२४ टक्के लागला होता. यंदा त्यात १ टक्क्याने घट झाली असली तरी नागपूर विभागात जिल्ह्याने अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील एकूण १७९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी १७९०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एकूण १६८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची एकूण टक्केवारी ९४.०४ टक्के आहे. तर निकालात मुलीच सरस ठरल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला एकूण ९२१४ विद्यार्थी तर ८६९४ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ८४५६ विद्यार्थी व ८३८५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.७७ तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.४४ टक्के आहे. जिल्ह्यात शहरीभागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांचा निकाल सरस आहे. जिल्ह्यात तिरोडा तालुका बारावीच्या निकालात टॉप ठरला आहे. गोंदिया तालुक्याचा निकाल ९४.४२ टक्के, आमगाव ९२.०९ टक्के, अर्जुनी मोरगाव ९६.९८ टक्के, देवरी ९३.८८ टक्के, गोरेगाव ९१.६० टक्के, सडक अर्जुनी ८६.५१ टक्के, सालेकसा ९५.६१ टक्के, तिरोडा तालुक्याचा निकाल ९७.२१ टक्के लागला असून हा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाnagpurनागपूरEducationशिक्षण