शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तलावांचा गोंदिया जिल्हा पडतोय कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:20 IST

यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअनेक तलावांनी गाठला तळ पाणी टंचाईचे संकट गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.मागील तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम शेती आणि सिंचन प्रकल्पावर होत आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्यात सिंचन योग्य एकूण ६९ प्रकल्प आहे. तर चार प्रकल्प मोठे आहे. यापैकी तीन प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी दिले जाते. मात्र यंदा या चारही मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठी केवळ इटियाडोह जलाशयाचे पाणी २१०० हेक्टरला देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लावगड करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले होते. मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व मालगुजारी तलाव ज्यांचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो अशा तलावांची संख्या ६५ आहे. मात्र सध्या स्थितीत यापैकी १४ तलावात केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर चिरचाळबांध व तेढा येथील तलावांनी आताच तळ गाठला आहे. मध्यम प्रकल्पाच्या चोरखमारा जलाशयात केवळ ७.३४ टक्के पाणीसाठा आहे. तर लघु प्रकल्पाच्या भदभदया तलावात ४.४३ टक्के, गुमडोह ३.९६ टक्के, रेहाडी ७.४५, रिसामा ३.१२, सोनेगाव ६.८५, सडेपार ०.३२, सेरपार जलाशयात केवळ ३.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर १० ते २० टक्के पाणीसाठा असलेले १५ जलाशयांचा समावेश आहे. बोदलकसा १७.०३ टक्के, चुलबंद १९.०३, रेेंगेपार १३.६६, आक्टीटोला १६.५३, पांगडी १७.४, राजोली ११.७२, जुनेवानी १९.६५ टक्के, बोपाबोडी १५.०६, काटी १७.३७, कोकणा १५.३८, खाडीपार १४.७८, निमगाव १२.७५, खोेडशिवणी १९.९६, नांदलपार ११.०७, ताडगाव ११.५० टक्के पाणीसाठा आहे.शहराची भिस्त पुजारीटोलावरमहाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत शहरवासीयांना पिण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील वर्षी वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गोंदियापासून ८० किमी अंतरावर असलेल्या पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. तिच परिस्थिती यंदा असणार असून प्रशासनाने त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत स्थिती बिकटजिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुनलेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झाला आहे. जिल्ह्यातील ६५ तलावात सध्यास्थितीत केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ९ मध्यम प्रकल्पात २८.९३ टक्के, लघु प्रकल्पात २८.६९ टक्के पाणीेसाठा आहे. मामा तलावात ३१ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यंदा जानेवारी महिन्यातच अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने यंदाचा उन्हाळा चांगलाच कडक असणार असल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई