गोंदियात बनावट देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:09 PM2020-02-29T23:09:21+5:302020-02-29T23:09:32+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी रात्री शहरातील बाजपेई चौक परिसरात केलेल्या कारवाईत २ लाख २१ हजारांची देशी दारू जप्त केली.

Gondia confiscates fake indigenous liquor | गोंदियात बनावट देशी दारू जप्त

गोंदियात बनावट देशी दारू जप्त

Next

गोंदिया - राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी रात्री शहरातील बाजपेई चौक परिसरात केलेल्या कारवाईत २ लाख २१ हजारांची देशी दारू जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार बाजपाई वॉर्ड येथे धर्मकाटाच्या बाजूला असलेल्या चारचाकीत बनावटी देशी दारू आढळली. याची किंमत २ लाख २१ हजार रुपये असून या मुद्देमालासह पोलिसांनी चारचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वीच याच परिसरात सुरु असलेल्या एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त केला होता.

Web Title: Gondia confiscates fake indigenous liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.