शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

परीक्षेला जाताय, कांदा खिशात ठेवलाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

यावर्षी मार्च महिन्यापासूनच भर उन्हात विद्यार्थी पेपर सोडू शकत नाही. याचा विचार सीबीएसई बोर्डाने करायला हवा होता. कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. सीबीएसई बोर्डाने उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा घेण्याचा आदेश काढला. एप्रिलपासून परीक्षा सुरू झाल्यामुळे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांच्या जिवाची लाही लाही होत आहे. १८ मेपर्यंत ही दहावीची परीक्षा चालणार असून १३ जूनपर्यंत बारावीची परीक्षा राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भातील उन्हाची परिस्थिती लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाने सकाळच्या पाळीत परीक्षा घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी भर उन्हात परीक्षा घेतल्यामुळे परीक्षार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाचे प्रमाण राज्यातील इतर भागात कमी असले तरीही वर्धा जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांवर गेले आहे. पण, परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना या उन्हाच्या तीव्रतेमध्ये घराबाहेर पडावे लागत असल्याने पालकांमध्येही रोष व्यक्त होत आहे.यावर्षी मार्च महिन्यापासूनच भर उन्हात विद्यार्थी पेपर सोडू शकत नाही. याचा विचार सीबीएसई बोर्डाने करायला हवा होता. कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. सीबीएसई बोर्डाने उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा घेण्याचा आदेश काढला. एप्रिलपासून परीक्षा सुरू झाल्यामुळे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांच्या जिवाची लाही लाही होत आहे. १८ मेपर्यंत ही दहावीची परीक्षा चालणार असून १३ जूनपर्यंत बारावीची परीक्षा राहणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहे; पण परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात घराबाहेर पडावे लागत आहे.

पारा ४४ अंशांच्यावरविदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णतेची तीव्र लाट आलेली आहे. जिल्ह्यातील तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाची कुलर किंवा खोली थंड ठेवायची व्यवस्था नाही. तीव्रता जाणवायला लागते. घराबाहेर पडताच अंगाचीही लाही लाही होत आहे. त्यामुळे आपले संरक्षण करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पालकांची चिंता वाढली

सूर्य आग ओकत आहे. अकरा वाजताच कडक उन्ह असल्यासारखे जाणवते. ४४ अंश तापमान गेलेले आहे. भर उन्हात उष्णतेच्या तीव्र लाटेत मुलांना परीक्षा केंद्रावर पाठवावे लागत आहे. मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाले तर याला जबाबदार कोण? याचा विचार व्यवस्थापकांनी करायला हवा.- संतोष वाढई, पालक

विद्यालयांच्या परीक्षा २८ मे पर्यंत चालणार आहे. आताच एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यानंतर मे महिन्यामध्ये काय अवस्था असेल याचा विचारही करू शकत नाही. मुलांची प्रकृती बिघडली तर दुसऱ्या दिवशीचा पेपर देऊ शकणार नाही. त्याचा पूर्ण वर्ष वाया जाईल, याचा विचार करायला पाहिजे.- राहुल पारखी, पालक 

उन्हापासून बचाव कसा कराल? - उन्हाळ्यात थेट सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येणे टाळावे. तसेच उन्हात जास्त न फिरता आपल्या शरीराचं तापमान कसं थंड राहणार याची काळजी घ्यावी. उन्हापासून बचाव करण्यासाठी एक कांदा खिशात ठेवावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे. दिवसभरात भरपूर पाण्याचे सेवन करावे. तसेच शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी. कडक उन्हाळ्यात बाहेर जाताना डोके झाकणे.nत्यासोबतच गॉगल लावा. यामुळे डोळ्यांचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होईल, घाम शोषून घेतील असे कपडे वापरावे. हलक्या रंगाचे वे सुती कपड़े वापरावे. घराबाहेर जाताना तुमच्याजवळ ग्लुकॉन-डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर बाळगा. एसीतून बाहेर आल्यावर काही वेळ एखाद्या जागेवर बसून घ्या. उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे अशा सरबतांचे सेवन वाढवावे.

सोयी सुविधांचा अभाव भर उन्हाळ्यात परीक्षा सुरू असून शरीराची लाही लाही होत आहे. जिल्ह्यातील काही शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये पंखे नाही.

 

टॅग्स :examपरीक्षा