शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘त्या’ आरोपींना फाशीची शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:56 PM

देवरी तालुक्यातील ग्राम फुटाणा येथील कलार समाजाच्या देशमुख कुटुंबातील २० वर्षीय युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.

ठळक मुद्देयुवतीवर अत्याचार व हत्या : कोसरे कलार समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ऑनलाईन लोकमतगोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम फुटाणा येथील कलार समाजाच्या देशमुख कुटुंबातील २० वर्षीय युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना १७ मार्च रोजी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील पंचायत समिती परिसरात घडली. या घटनेचा जिल्हा युवा कोसरे कलार समाज संस्थेने निषेध केला असून घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देवून न्याय देण्याची मागणी केली आहे.मयंक उर्फ गोलू देशमुख रा. किन्ही-बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा असे त्या नराधम आरोपीचे नाव असून तो लाखणी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तसेच तो साकोली येथील ट्रॅक्टर कंपनीत नोकरीवर होता. सदर युवतीवर मध्यरात्रीदरम्यान अमानुषपणे अत्याचार करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. यानंतर २० मार्च रोजी मयंकच्या भाड्याच्या खोलीत कुजलेल्या स्थितीत त्या युवतीचा मृतदेह परिसरातील नागरिकांना आढळला. या घटनेत आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता कलार समाजाने व मृत युवतीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.या अमानविय घटनेबद्दल कलार समाजात रोष व्याप्त आहे. आरोपी मयंक देशमुख याला त्वरित अटक करण्यात यावे, इतर आरोपींचा त्वरित शोध घेवून त्यांनाही अटक करावी व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कोसरे कलार समाज संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री फडवीस, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच आरोपींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्ववर्गीय कलार समाजाने दिला आहे.निवेदन देताना कोसरे कलार समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष तिर्थराज उके, जिल्हा सहसचिव उमेश शहारे, दिनेश फरकुंडे, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, नर्बद मेश्राम, प्रशांत तांडेकर, डी.एम. दखने, ऋषी उके, अविनाश मेश्राम, विजयकुमार कावळे, कुणाल चौरागडे, भुवनलाल देशमुख, पुरणचंद मेश्राम, रविंद्र कावळे, संजय शेंडे, संतोष मेश्राम, एस.बी. मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Murderखून