शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती मिळवा एका ॲपवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:18 IST

Gondia : दहावी-बारावीचे टेन्शन सोडा; ॲप डाउनलोड करा

गोंदिया : केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधांसाठी मंडळाने मोबाइल ॲप विकसित केले असून बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे यामुळे सुलभ झाले आहे. विद्यार्थीपालक, शाळा, कर्मचारी यांना उपयुक्त असे ॲप आहे. त्यामुळे हे ॲप डाऊनलोड करून दहावी बारावीचे टेन्शन सोडा, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 'एमएसबीएसएचएसई' ॲपची निर्मिती केली आहे. याचा लाभ शिक्षक, विद्यार्थी, पालकांसाठी होणार आहे.

'एमएसबीएसएचएसई' ॲपची वैशिष्ट्ये काय? 

  • ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध नमुना प्रश्नपत्रिका वेळापत्रक निकाल यासह अनुषंगिक बाबी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. 
  • फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण यासह अनुषंगिक सुविधा शाळांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
  • अन्य नवीनतम अद्ययावत सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगिनशिवाय उपलब्ध करून दिली आहे.

मॉडेल प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येणार शिक्षण मंडळाने तयार केलेले ॲप हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी उपयुक्त आहे. या ॲपवर मॉडेल प्रश्नपत्रिकाही देण्यात आल्या आहेत. या प्रश्नपत्रिका विद्यार्थी डाउनलोड करू शकतात.

टाइमटेबल, नोटिफिकेशन्स वेळोवेळी मिळणार हे ॲप तुम्हाला परीक्षेचे वेळापत्रक, गुणपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका, झटपट निकाल, फी परतावा, अंतर्गत आणि व्यावहारिक गुण आणि इतर उपयुक्त सूचना आणि अपडेट्समध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते.

अँप कसे डाउनलोड करायचे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 'एमएसबीएसएचएसई' ॲपची निर्मिती केली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे आहे. त्यांनतर आपली संपूर्ण माहिती भरून ॲप सुरू करायचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रgondiya-acगोंदिया