जात प्रमाणपत्र व नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांचे सर्रास शोषण

By Admin | Updated: May 23, 2014 23:59 IST2014-05-23T23:59:10+5:302014-05-23T23:59:10+5:30

सध्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध जाहिरातीसाठी अर्ज भरण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात पोलीस विभागामार्फत पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यात जाती प्रमाणपत्र व नुतनीकरण

Generally exploitation of students for caste certificate and renewal | जात प्रमाणपत्र व नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांचे सर्रास शोषण

जात प्रमाणपत्र व नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांचे सर्रास शोषण

आमगाव : सध्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध जाहिरातीसाठी अर्ज भरण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात पोलीस विभागामार्फत पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यात जाती प्रमाणपत्र व नुतनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना भटकावे लागत आहे. त्याचबरोबर शोषण सुरू आहे. देवरी उपविभागीय कार्यालयातून पैसे घेतल्याशिवाय कोणतेच कागद समोर जात नाही. मात्र यावर अधिकार्‍यांची पूर्ण डोळेझाक आहे. विद्यार्थी व पालकांत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. तालुक्यातून ३ मे रोजी नुतनीकरणासाठी देवरी एस.डी.ओ. कार्यालयात सर्व कागद पाठविण्यात आले. मात्र तब्बल बावीस दिवस लोटले, मात्र नुतनीकरणाचे कागद विद्यार्थ्यांच्या हाती लागले नाही. चौकशीकरिता टेलिफोन वरुन भोयर या महिलेने संबंधीत लिपिक भंडार्‍यावरुन येण्यास आहेत असे उत्तर दिले. जवळपास १० वाजता कार्यालयीन वेळ असून भंडार्‍यावरुन पाठक नावांचे संबंधित लिपिक साडेअकरा वाजेपर्यंत पोहोचतात. याला कारण म्हणजे येथील उपविभागीय अधिकारी रजेवर असल्याचे सांगण्यात आले. शंभर रुपये घेऊन तेच कागद बाहेर काढले जातात. एका बाजूला नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ तर आॅनलाईन वेळी नुतनीकरण प्रमाणपत्र नाही. त्यामुळे निराश होवून अनेक विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Generally exploitation of students for caste certificate and renewal