शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

फुट पंपाद्वारे शेतीस पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:54 IST

शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था कमी भांडवलामध्ये व्हावी, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने नुकतेच मुंडीपार येथे आय. आय. टी. मुंबईचे संशोधन असलेल्या फुट पाणी पंपाचे व ड्रिपचे प्रात्यक्षिक....

ठळक मुद्देमहिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्र म : पाणी व विजेची बचत शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था कमी भांडवलामध्ये व्हावी, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने नुकतेच मुंडीपार येथे आय. आय. टी. मुंबईचे संशोधन असलेल्या फुट पाणी पंपाचे व ड्रिपचे प्रात्यक्षिक शेतकºयांना देण्यात आले. यामुळे वीज आणि पैशाची बचत करणे शेतकºयांना शक्य होणार आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिविका अभियान राबविले जात आहे. ग्रामीण महिलांच्या उपजिविका वाढविण्याकरीता सुधारित शेळी पालनावर आधारित उपजिविका कार्यक्र म, मत्स्यपालनावर आधारित कार्यक्र म व कृषी फलोत्पादन कार्यक्र म राबविण्यात येत आहे.कृषी फलोत्पादन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील शेतकरी महिलांच्या उत्पादन वाढीच्या कार्यक्रमातंर्गत शेतमजुरीवर होणारा अधिकचा खर्च कमी करुन उत्पन्नात भर पडावी, कमी वेळेत अधिक काम पार व्हावे, या हेतूने यांत्रिकी शेतीवर भर देण्यासाठी गाव पातळीवर कृषी अवजारे बँकेची संकल्पना राबविण्यात आली. सालेकसा तालुक्यातील खोलगड, कारु टोला व मुंडीपार या गावी सदर औजार बँकेकरीता प्रती गाव ३ लाख रु पयांचा निधी देण्यात आला. याच उपक्रमातंर्गत शेतकºयांना वीज आणि पाण्याची बचत करणे शक्य व्हावे. यासाठी फुट पाणी पंपाचे व ड्रिपचे प्रात्यिक्षक करण्यात आले. या फुट पाणी पंपाद्वारे विहीर, कालव्यातून किंवा नाल्यातून २५ फुटापर्यंतचे पाणी विना विद्युत ओढून वरती ४० फुटापर्यंत आणण्याकरिता २ इंचाच्या पाईपच्या सहाय्याने १०० फुटापर्यंत पुढे व १ इंचाच्या पाईपच्या सहाय्याने ३०० फुटापर्यंत पुढे या पंपाद्वारे शेतीला पाणी देणे शक्य आहे. विना विद्युत ठिबक सिंचन करता येते. याकरीता शेतकºयांकडे पाण्याची किमान २०० लिटरची टाकी आवश्यक असून याद्वारे जमीन सिंचनाखाली आणणे शक्य आहे.याकरीता फुट पाणी पंप ४९५० रु पयांना व ठिबक सिंचन (ड्रीप) एका गुंठ्याकरीता १८०० रुपयांच्या खर्चात मिळू शकेल. अल्पभूधारक शेतकºयांनाही हया फुट पाणी पंप व ठिबक सिंचनाद्वारे कमी भांडवलात जास्त उत्पादन घेवू शकतील. अशी माहिती आय.आय.टी.मुंबईचे प्रकल्प अभियंता विकास झा यांनी दिली. या प्रात्यक्षिकास शेतकºयांनी चांगला प्रतिसाद दिला.प्रात्यक्षिकाकरीता माविमचे जिल्हा समन्यवक अधिकारी सुनील सोसे, उमेदचे जिल्हा उपजिविका व्यवस्थापक नसीर शेख, माविम सालेकसा तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड, तालुक्यातील कृषी सखी, गावातील शेतकरी, स्वयंसहायता महिला बचतगटातील महिला, प्रभाग समन्वयक, सहयोगीनी समुदाय पशुधन व्यवस्थापक व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.