लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : समाजात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करते. सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा संहार या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याचे खूप महत्व आहे. समाज जीवनात वावरताना अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. १५ टक्के अत्याचार केवळ कुटूंबातच होतात. शालेय वातावरणातील विद्यार्थ्यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवून स्वत:चे जीवन साफल्य करण्यात प्राथमिकता द्यावी. सभ्य आज्ञाधारक, विश्वासू, बुद्धीमान, शूर व समजदार असे विविधांगी गुण अंगीकारणारा पोलीस समस्त सामान्य जणांचा मित्र आहे असे प्रतिपादन ठाणेदार महादेव तोंदले यांनी केले.जवळील ग्राम चान्ना-बाक्टी येथील मिलिंद विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस स्थापना दिवस सप्ताहाप्रसंगी विद्यार्थ्यांना भारतीय कायदे विषय माहिती देताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य राजन बोरकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक पोलीस निरीक्षक माणिक खरकाटे, पोलीस हवालदार देवदास कन्नाके, घनशाम मुळे, श्रीकांत मेश्राम, विजय कोटांगले, रामेश्वर मेश्राम, शेंडे उपस्थित होते.पुढे बोलताना तोंदले यांनी, एखाद्या समाजातील विविध सदस्यांना वाईट वाटणारे वर्तन म्हणजे सामाजिक समस्या ही वेळ येऊच नये, म्हणून जागरुक असणे आवश्यक आहे. नजर, स्पर्श व उच्चार ज्ञात होणे महत्वाचे आहे. भादंवि ५०९, ३५४, ३७६ व सहकलम ४,६,८,१०,१२ हे महिला व बालकांना न्याय देण्यासाठी व गुन्हेगारांना कमीत कमी २० वर्षापर्यंत शिक्षा व द्रवदंड यासाठी आहेत. कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी २००५ मध्ये कायदा संमत करण्यात आला. सॉफ्टवेअर व हार्डवेअर मध्ये हॅकर्स, ट्रॅकर्स, इनसायडर्स यापासून सोशल नेटवर्क क्षेत्रात स्वत:ची गुप्त माहिती देऊ नये असेही त्यांनी सांगितले.खरकाटे यांनी, वाहन हाताळताना योग्य कागदपत्रे सोबत ठेवावी व नियमांचे पालन करावे असे त्यांनी सांगितले. यावेळी एसएलआर रायफल व इन्स्टंट रायफल याविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. सोशल नेटवर्कींग, सायबर क्राईम, महिला व बालका संबंधीचे गुन्हे, वाहतूक नियमन, पोलीस विभागाचे दैनंदिन कामकाज याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. संचालन प्रा. गिरीष बोरकर यांनी केले. आभार जयेश भोवते यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस सामान्यजनांचे मित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST
एखाद्या समाजातील विविध सदस्यांना वाईट वाटणारे वर्तन म्हणजे सामाजिक समस्या ही वेळ येऊच नये, म्हणून जागरुक असणे आवश्यक आहे. नजर, स्पर्श व उच्चार ज्ञात होणे महत्वाचे आहे. भादंवि ५०९, ३५४, ३७६ व सहकलम ४,६,८,१०,१२ हे महिला व बालकांना न्याय देण्यासाठी व गुन्हेगारांना कमीत कमी २० वर्षापर्यंत शिक्षा व द्रवदंड यासाठी आहेत.
पोलीस सामान्यजनांचे मित्र
ठळक मुद्देमहादेव तोंदले : मिलिंद विद्यालयात विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती