शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

मित्रांनीच केले मित्राचे तुकडे

By admin | Updated: May 16, 2017 00:55 IST

गोंदिया येथील कुंभारेनगराच्या सिंगलटोली येथील प्रभाकर किशन मानकर (१७) या मुलाला त्याच्या मित्रांनी पार्टी करण्याच्या नावावर नेऊन त्याचा खून केला.

७ महिन्यानंतर घटना उघडकीस : एलसीबीने अटक केलेल्या आरोपीने दिली कबुलीलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया येथील कुंभारेनगराच्या सिंगलटोली येथील प्रभाकर किशन मानकर (१७) या मुलाला त्याच्या मित्रांनी पार्टी करण्याच्या नावावर नेऊन त्याचा खून केला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीला अटक केली.सिंगलटोली येथील प्रभाकर मानकर हा दिवाळीच्या नंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत ऊस विक्री करायचा. उर्वरित वेळेत चने-फुटाणे विकून वडिलास मदत करायचा. सन २०१६ च्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तो ऊस विकून घरी गेल्यानंतर त्याच्या चार मित्रांनी पार्टी करण्याच्या नावावर प्रभाकरला घेऊन गेले. त्याने ऊस विकून जमविलेले ११ हजार रुपये त्याच्याजवळ होते. पार्टी करण्याच्या नादात मित्रांमध्ये झालेल्या वादात तिघांनी प्रभाकरचा खून करुन सिंगलटोली येथील रेल्वे क्वार्टरच्या कोरड्या असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह टाकून दिला. त्या विहिरीत चिखल आहे. शरीरापासून मुंडके वेगळे, धड वेगळे, हात वेगळे, पाय वेगळे असे मृतदेहाचे तुकडे करुन पोतीत भरुन विहिरीत टाकण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस गोंदिया शहरातील एका दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यास गेले असताना गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक (२२८/१६) अन्वये भादंविच्या कलम ३६६, ३६४, ३४ अन्वये गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणातील फरार आरोपी पंकज देवराज मेश्राम (२७) रा. भीमनगर याला आणले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने सदर घटनेची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रभाकर घरी न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली होती. गोंदिया शहर पोलिसांनी अपराध क्रमांक (२२८/१६) अन्वये भादंविच्या कलम ३६६, ३६४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंकज मेश्रामला अटक केल्यावर सदर प्रकरण उघडकीस आले. सोमवार (दि.१५) रोजी दुपारी गोंदिया शहर पोलिसांनी सिंगलटोली येथील रेल्वे क्वार्टरच्या विहिरीतून सदर मृतदेह शैलेश आत्माराम गजभिये रा. भीमनगर यांच्या हातून काढून उत्तरीय तपासणीसाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. प्रभाकरने घटनेच्या दिवशी परिधान केलेली टी-शर्ट या विहिरीत आढळली. सोबत मृतदेहाजवळ मोठा दगड असल्याने तो दगडही पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील उर्वरित दोनपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जाते. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरुच होती.हरवला वंशाचा दिवासिंगलटोली येथील किशन मानकर यांना पाच मुली व प्रभाकर एकटाच मुलगा होता. रात्रंदिवस सोबत राहणाऱ्या मित्रांसोबत राहाणे, खेळणे बाळगणे, फिरायला जाणे यामुळे घरचेही बिनधास्त होते. परंतु मित्र म्हणून वावरणारेच लोक खून करतील याची कल्पनाही नसताना पार्टी करण्याच्या नावावर घेऊन गेलेल्या मित्रांनी क्षुल्लक कारणातून भांडण करून खून केला. किशन यांचा एकुलता एक मुलगा मित्रांनीच संपविला.बालकांकडून वाढताहेत शारीरिक गुन्हेगोंदिया शहरात होणाऱ्या शारीरिक गुन्ह्यांमध्ये १८ वर्षाखालील बालकांचा समावेश असतो. खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या या प्रकरणात गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. आईवडिलांच्या दुर्लक्षामुळे अल्पवयीन मुले शारीरिक गुन्हे करीत आहेत.