मोफत धान्य वाटपात होत आहे घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:00 AM2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:34+5:30

‘लॉकडाउन’मुळे सर्वत्र काम बंद झाले असून गरीब मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अशात कोणीही उपाशी राहु नये म्हणून गरजुंना एप्रिल, मे व जून या ३ महिन्यात प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. तसेच दर महिन्याला मिळणारे धान्य अंत्योदय योजना व प्राधान्यक्रमा अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थी तसेच अतिशय गरजू व्यक्तीला देण्यास प्राधान्य आहे.

Free grain allocation is happening in the mix | मोफत धान्य वाटपात होत आहे घोळ

मोफत धान्य वाटपात होत आहे घोळ

Next
ठळक मुद्देबायोमॅट्रिक नसल्याचा गैर फायदा । अधिकाऱ्यांचे प्रकाराकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ‘लॉकडाऊन’मुळे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने नियमित रेशन देण्याव्यतिरिक्त लाभार्थ्यांला दर महिन्याला प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मागील २ दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटपाला सुरूवात झाली असून अनेक स्वस्त धान्य दुकानदार तांदूळ वाटपात गैरप्रकार करीत असल्याची ओरड तालुक्यात अनेक गावात सुरू आहे.
‘लॉकडाउन’मुळे सर्वत्र काम बंद झाले असून गरीब मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अशात कोणीही उपाशी राहु नये म्हणून गरजुंना एप्रिल, मे व जून या ३ महिन्यात प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. तसेच दर महिन्याला मिळणारे धान्य अंत्योदय योजना व प्राधान्यक्रमा अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थी तसेच अतिशय गरजू व्यक्तीला देण्यास प्राधान्य आहे. मोफत तांदूळ वाटप करताना बायोमॅट्रिक प्रणालीचा वापर करण्याची गरज नाही. शिधापत्रिकेवर जेवढ्या व्यक्तीची नोंद आहे तेवढ्यांना प्रत्येकी ५ किलो प्रमाणे तांदूळ द्यायचे आहे. परंतु तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार घोळ करीत असल्याचा प्रकार सामोर आला आहे.
तालुक्यातील एकूण ८७ स्वस्त धान्य दुकानांमधील अनेक दुकानदारांनी शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून मनमानी करीत असल्याची माहिती आहे. एका गावात एक शिधापत्रिकाधारक मोफत स्वस्त धान्य मागायला गेले असता कार्डवर ५ लोकांची नोंद असून त्याला २५ किलो तांदूळ देण्याऐवजी फक्त १५ किलो तांदूळ दिले.
एका दुसऱ्या दुकानदाराने २० किलो ऐवजी १५ किलो दिल्याची तक्रार आहे. एका दुकानदाराने धान्यच आले नाही म्हणून कार्डधारकाला परत घरी पाठविले. तर एका दुकानदाराने या महिन्यात मिळणार नाही असे सांगितल्याची तक्रार समोर आली आहे.
१ एप्रिलपासून मोफत तांदूळ देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश असून सुद्धा काही स्वस्त धान्य दुकानदार ग्रामीण भागातील जनतेला मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रसार माध्यमातून आता शासनाचे प्रत्येक निर्णय लोकांना त्वरीत व स्पष्टपणे माहिती होतात. तरी काही लोक आपली चालाखी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासना आदेशाप्रमाणे लोकांना धान्य वाटप केले जात आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी तहसीलदारांनी आपली यंत्रणा कामाला लावली पाहिजे.
तसेच संशयीत ठिकाणी स्वत: जावून पाहणी केली पाहिजे. परंतु तहसीलदार या बाबतीत स्वयंस्फूर्त दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या समस्या कोण सोडविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धान्य वाटपात विलंब का?
प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून करणे गरजेचे होते. काही तांत्रिक अडचणींचा अपवाद वगळता १-२ दिवस उशीर समजता येईल. परंतु मोफत धान्य वाटपात पूर्ण एक आठवडा उशीरा झाला असून काही दुकानदारांनी आतापर्यंत वाटप सुरू केले नाही. दरम्यान ‘लोकमत’ प्रतिनिधीने याबाबत सुरूवातीला ३ एप्रिल रोजी पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता शासनाचे आदेश मिळाले नाही व मोफत देण्याचे तांदूळ सुद्धा आले नाही असे सांगितले. त्यानंतर लगेच तहसीलदारांशी विचारपूस केल्यावर पदाला साजेसे उत्तर न देता गोदाम खाली नसल्याने धान्य आणले नाही असे सांगीतले. यावरून अधिकारी किती जवाबदारीने शासन आदेशाचे पालन करीत आहेत हे दिसून आले.

लाभार्थी कार्डधारकांना शासनाच्या आदेशान्वये मोफत तांदूळ न देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारविरूद्ध कार्यवाही करण्यात येईल. यात आपली जवाबदारी इमानदारीने पार पाडत नसल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही गय केली जाणार नाही.
-सहषराम कोरोटे
आमदार, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र.

Web Title: Free grain allocation is happening in the mix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.