शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी सळ्यांसह गुन्ह्यातील चारचाकी वाहनही केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:30 IST

ट्रक चालक फिर्यादी प्रवीण रामभाऊ धांडे (रा.मानकापूर, नागपूर) हे ट्रक क्रमांक सीजी ०७-सीए ३४०० मध्ये रायपूर येथून १२ लाख ४५ हजार ६३३ रुपये किमतीच्या २५ टन ४० किलो वजनाच्या लोखंडी सळ्या घेऊन २८ फेब्रुवारी रोजी नागपूरला जात होते. मात्र, देवरी येथे महामार्गावर पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात आलेल्या ७ जणांनी त्यांना मारहाण करून व हातपाय व डोळ्याला पट्टी बांधून ट्रक पळून नेला होता.

ठळक मुद्देचालकासह ट्रक पळविल्याचे प्रकरण : हिंगणा येथील ७ जणांची टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोखंडी सळ्या घेऊन नागपूरला जात असलेल्या ट्रक चालकाला मारहाण करून, त्याच्यासह ट्रक पळवून सळ्या काढून चालक व ट्रकला नागभिड येथे सोडण्यात आले होते. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत महामागार्वर २८ फेब्रुवारी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी ७ जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. लोखंडी सळ्या व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, ट्रक चालक फिर्यादी प्रवीण रामभाऊ धांडे (रा.मानकापूर, नागपूर) हे ट्रक क्रमांक सीजी ०७-सीए ३४०० मध्ये रायपूर येथून १२ लाख ४५ हजार ६३३ रुपये किमतीच्या २५ टन ४० किलो वजनाच्या लोखंडी सळ्या घेऊन २८ फेब्रुवारी रोजी नागपूरला जात होते. मात्र, देवरी येथे महामार्गावर पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात आलेल्या ७ जणांनी त्यांना मारहाण करून व हातपाय व डोळ्याला पट्टी बांधून ट्रक पळून नेला होता. त्यानंतर, आरोपींनी ट्रकमधील सळ्या अन्यत्र काढून धांडे यांना ट्रकसह चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड-नागपूर मार्गावरील नवखडा गावाजवळ सोडून दिले होते. प्रकरणी नागभिड पोलीस ठाणे व देवरी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३४१, ३९५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करून भंडारा, नागपूर व नागभिड येथे जाऊन तपास सुरू केला असता, नागपूर येथील इसम पप्पू हसन (रा.डोंगरगाव,हिंगणा) हा आपल्या साथीदारांसह अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याची माहिती त्यांच्या हाती लागली. यावर पथकाने पप्पू हसनला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने आपल्या ७ साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले व विचारपूस केली असता, त्यांनी कबुली देत, लोखंडी सळ्या कोठे ठेवल्या आहेत, याचीही माहिती दिली. त्यानुसार, पथकाने नागपूर येथे जाऊन ग्राम सोंडपार येथील महामार्गापासून दूर आत कच्च्या रस्त्यावरून लोखंडी सळ्या व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. 

या साथीदारांना केली अटक या प्रकरणात पोलिसांनी शफीर नजीर हसन उर्फ पप्पू हसन (५५) याच्यासोबत हा गुन्हा करणाऱ्या शुभम वासुदेव चक्रवर्ती (३१,रा.नवीन गुमगाव), ऋषभ ज्ञानेश्वर चिरूटकर (१९,रा. नवीन गुमगाव), अरुण देवाजी वरखडे (२२, रा.नवीन गुमगाव), महेंद्र नेवालाल गमधरे (३५, रा.डोंगरगाव), अभिलेख नामदेव गावतुरे (१९,रा. नवीन गुमगाव) व अशोक लक्ष्मण दुधनाग (१९, रा.नवीन गुमगाव) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना सोमवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर