शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गोंदियातील चार हजार मतदारांना रुचला नाही एकही उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:56 IST

Gondia Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : नोटाला दिली पसंती: गोंदिया मतदारसंघात सर्वाधिक वापर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीचा लागला असून यामध्ये चार हजार १६० मतदारांना रिंगणात आपले भाग्य आजमाविणाऱ्या ६४ उमेदवारांपैकी एकही उमेदवार रुचला नसल्याचे दिसून आले. हेच कारण आहे की, मतदान करताना या मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचे निकालातून दिसले. विशेष म्हणजे, नोटाला सर्वाधिक पसंती दर्शविणारे एक हजार ४४१ मतदार गोंदिया विधानसभा मतदारसंघातील आहेत.

निवडणूक आयोगाने ज्या मतदारांना एकही उमेदवार पसंतीस पडलेला नाही अशांना 'नोटा' हा पर्याय मतदान यंत्रावर उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाचा मोठ्या प्रमाणात उपयोग मतदार करीत असल्याचेही निवडणुकीत दिसून येते. विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि. २३) लागला असून यामध्ये जिल्ह्यातील तब्बल चार हजार १६० मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली असल्याचे दिसले.

यामध्ये अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात ८०१ मतदारांनी, तिरोडा मतदारसंघात ७२४ मतदारांनी, गोंदिया मतदारसंघात सर्वाधिक एक हजार ४४१ मतदारांनी तर आमगाव विधानसभा मतदारसंघात एक हजार १९४ मतदारांनी नोटा या पर्यायाची निवड केली आहे.

२०१९ च्या तुलनेत दिसली घट यंदा जिल्ह्यात जेथे चार हजार १६० मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. तेथेच मात्र सन २०१९ मध्ये ही संख्या सात हजार ९९ एवढी होती. म्हणजेच, यंदाची आकडेवारी बघता जिल्ह्यात नोटाला पसंती दर्शविणाऱ्या मतदारांची संख्या घटली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, सन २०१९ च्या निवडणुकीत अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक दोन हजार २७ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली होती.

उमेदवारांनाही मिळाली नाहीत एवढी मतेयंदाच्या निवडणुकीत तब्बल चार हजार १६० मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली आहे. विशेष म्हणजे, पक्ष व अपक्ष उमेदवारांनाही एवढी मते मिळाली नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यंदा तब्बल ४० उमेदवारांना एक हजारच्या आतच मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे मात्र चार हजार १६० मतदारांनी नोटाला पसंती दर्शविणे ही मात्र आश्चर्याची बाब आहे. 

मतदार संघनिहाय नोटाचा तक्ता मतदारसंघ                २०२४             २०१९  अर्जुनी-मोरगाव            ८०१                २०२७तिरोडा                       ७२४               १८४१ गोंदिया                       १४४१              १८५२ आमगाव                     ११९४              १३७९ एकूण                         ४१६०              ७०९९

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024gondiya-acगोंदियाVotingमतदान