शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना चार जिल्ह्यांतून केले तडीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:19 IST

आमगाव पोलिसांची धाडसी कारवाई : चार जिल्ह्यांतून तीन महिन्यांसाठी तडीपार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील आमगाव पोलिस ठाणे हद्दीतील अवैध गोवंश वाहतूक व गोमांस विक्री करणाऱ्या एका टोळीतील चार सदस्यांना आमगाव पोलिसांनी वारंवार पकडूनही त्यांच्या कृत्यात सुधारणा न आल्यामुळे चौघा जनावर तस्करांना तब्बल तीन महिन्यांसाठी चार जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे.

वसिम नासिर कुरैशी (३४), समीर नासिर कुरैशी (२९), सफिक शरिफ कुरैशी (४५) व दानिश सफिक कुरैशी (२२, सर्व रा. कुंभारटोली, ता. आमगाव) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीतील आरोपी सराईतपणे अवैधरीत्या गोवंश वाहतूक व गोमांस विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर वेळोवेळी आमगाव पोलिसांनी धाड घालून गुन्हे दाखल केले आहेत. या सराईत आरोपींच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याकरिता तसेच करीत असलेल्या गुन्ह्याला प्रतिबंध करण्याकरिता महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ५५ प्रमाणे तडीपार करण्यात आले. 

यांनी केली कारवाईतडीपारची कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात आमगाव पोलिस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, स्थानिक गुन्हे शाखे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहिरकर, आमगाव गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार दुधराम मेश्राम, असिम मन्यार, विनोद उपराडे, शिपाई चेतन शेंडे, नितीन चोपकर, दिनेश वानखडे, भागवत कोडापे, मिलनसिंह मंजुटे, महिला पोलिस हवालदार यशोदा भोयर, विनिशा बहेकार यांनी केली आहे.

या आरोपींवर १० गुन्ह्यांची नोंदजनावरांची तस्करी करणे व इतर असे १० गुन्हे या आरोपींवर असल्याने ते समाजासाठी घातक असल्याचे ठरवीत त्यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये गोंदिया, भंडारा, गडचिरोली व मध्यप्रदेशातील बालाघाट येथून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया