शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात ट्रकच्या धडकेत तीन जण ठार; मृतकांमध्ये वडील व मुलाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 17:13 IST

गोंदिया तालुक्यातील पिंकेपार येेथे लग्न सोहळ्याकरिता शनिवारी बिसेन कुटुंबीय दासगाववरून मोटारसायकलने आले होते.

गोंदिया : भरधाव ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत तीन मुलांसह वडील ठार झाल्याची घटना गोंदियापासून चार कि. मी. अंतरावर असलेल्या भागवटोला जवळ शनिवारी (दि.१) दुपारच्या सुमारास घडली. आदित्य बिसेन (७), मोहित बिसेन (११) असे मृतक मुलांची तर कुमेंद्र बिसेन (३७) रा. दासगाव व आर्वी कमलेश तूरकर (५ ) असे अपघातात ठार झालेल्यांची नाव आहे. अपघतानंतर ट्रक चालक घटना स्थळावरुन पसार झाला. 

गोंदिया तालुक्यातील पिंकेपार येेथे लग्न सोहळ्याकरिता शनिवारी बिसेन कुटुंबीय दासगाववरून मोटारसायकलने आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर दासगाव येथे मोटरसायकलने जात असताना ढाकणी ते भागवतटोला या रस्त्यावर ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक ऐवढी जोरदार हाेती की त्या धडकेत घटना स्थळी दोन मुलांचा व ३७ वर्षी कुमेंद्र बिसेन यांचा मृत्यू झाला. अपघातानानंतर ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला. याची माहिती रामनगर पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर ट्रक चालकाविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातgondiya-acगोंदिया