शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपती राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असून २८ तेंदूपत्ता युनिट आहे. तसेच या जंगलामध्ये मोहा वृक्षाचे प्रमाण देखील अधिक आहे. यंदा मागील दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत जंगलात लावलेल्या वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपदा जळून राख झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देजंगलातील वणव्याच्या घटनांमध्ये वाढ : तीन वन विभागात समन्वयाचा अभाव

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याला सुरुवात होताच जंगलात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. तेंदूपत्ता आणि मोहफुलाचे संकलन करण्यासाठी नागरिक जंगलामध्येआगी लावतात. मात्र याप्रकारामुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होत असून याला प्रतिबंध लावण्यासाठी वन विभागाच्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे उघडकीस आली आहे. जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असून २८ तेंदूपत्ता युनिट आहे. तसेच या जंगलामध्ये मोहा वृक्षाचे प्रमाण देखील अधिक आहे. यंदा मागील दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत जंगलात लावलेल्या वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपदा जळून राख झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यात संवेदनशील क्षेत्र समजल्या जाणाऱ्या नवेगावबांध- नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील बफर झोन आणि चिचगड, सालेकसा, तिरोडा, उत्तर देवरी, सडक अर्जुनी, गाेरेगाव, नवेगाव, गोठगाव या वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या घटनांमुळे हजारो हेक्टरमधील वनसंपत्तीचे नुकसान झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. तेंदूपत्ता संकलन आणि मोहफुले वेचण्यासाठी काही जण रात्रीच्यावेळीस जंगलात आग लावत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र आगीमुळे मौल्यवान संपत्ती नष्ट होत आहे. याला प्रतिबंध लावण्यात वन, वन्यजीव आणि वनविकास महामंडळ हे तिन्ही विभाग समन्वयाअभावी अपयशी ठरत आहे. 

जिल्ह्यात दररोज वणव्याच्या ३५ घटना जंगलात लागणाऱ्या वणव्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी फाॅरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियातर्फे सॅटेलाईटच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. वणव्याची माहिती फायर वॉचर टीम आणि संबंधित वन विभागाला दिली जाते. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलात वणवा लागण्याच्या दरराेज ३५ घटना घडत आहेत. वणवा नियंत्रणासाठी ५० फायर वॉचर टीमउन्हाळ्याच्या दिवसात जंगलात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी ५० फायर वाॅचर टीम गठित करण्यात आल्या आहे. एका टीमध्ये ३ सदस्यांचा समावेश आहे. वॉच टॉवर, सॅटेलाईट, वनरक्षक, वन मजूर यांचीसुध्दा मदत घेतली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २६ फायर ब्लोअर सुध्दा या टीमला उपलब्ध करुन देण्यात आले. २ एप्रिलला ५० आगीच्या घटनांची नोंद तेंदूपत्ता आणि मोहफुल संकलनासाठी काही नागरिक जंगलामध्ये रात्रीच्या वेळेस आगी लावतात. शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील जंगलामध्ये ५० ठिकाणी आग लागल्याची घटनांची नोंद झाल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. 

 

टॅग्स :forestजंगलfireआग