शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भटक्या गोपाळ समाजबांधवांना गावकऱ्यांची अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू तसेच समाजाशील शिक्षक प्रदीप ढवळे यांच्याकडून रोख मदत करून हातभार लावला.

ठळक मुद्देबोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतचे दायित्व : भटक्या गोपाळ समाजाच्या मदतीसाठी पुढे या

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळच्या बोदरा-देऊळगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत देऊळगाव येथे भटक्या जमातीमधील ‘गोपाळ’ समाज मागील काही वर्षांपासून ५-६ कुटुंब कायमस्वरूपी वास्तव्याने राहत आहेत. गावोगावी बिºहाड नेऊन अंग मोहनतीचे खेळ दाखवून पोटाची खडगी भरतात. घरातील महिला भगिनी लहान मुलांसह गावा-गावात भिक्षा मागतात यावरच त्यांच्या घरची चूल पेटते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू तसेच समाजाशील शिक्षक प्रदीप ढवळे यांच्याकडून रोख मदत करून हातभार लावला.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील देऊळगाव-बोदरा येथे भटक्या जमातीचे गोपाळ समाजाचे शंकर राऊत, किशोर राऊत, अशोक राऊत,हिरामन नेवारे, दिलीप नेवारे यांच्या ५ कुटुंबात १९ लोक राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी ही लोक आपल्या कुटुंबासह बाहेरी राज्यात जावून पोटाची खडगी भरतात. देऊळगावात कायम स्वरूपी वास्तव्याने असणारा गोपाळा समाज आजही गावात सकाळच्यावेळी भीक्षा मागून दारोदार फिरून मिळेल त्या भिक्षेनी भूक भागवितात. गावात मिळाले त्या कामावर पुरूष मंडळी जातात. मात्र महिला भगिनी दारोदार फिरून भिक्षा पात्रात मिळालेल्या अन्नधान्यावरच त्यांच्या घरची चूल पेटते.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानी गोपाळ समाजाला गावात भिक्षा मागण्यासाठी जाणे सुध्दा आता कठीण झाले आहे. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी सरपंच शंकर उईके पुढे आले. ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित दानदात्यांच्या सहभागाने प्रत्येक कुटुंबाला २० किलो तांदूळ जीवनावश्यक वस्तु रोख स्वरुपात मदत दिली.देऊळगावचे स्वस्त धान्य दुकानदार शामराव झोळे, बोदराचे भागवत झोळे या दोघांनी १०० किलो तांदूळ उपलब्ध करून दिले. अन्नधान्यासह जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप करताना सरपंच शंकर उईके, उपसरपंच गजानन शहारे, ग्रामसेवक व्ही.आर.ढोक, सदस्य सुनील बनकर, दिनेश चौधरी, योगेश्वर झोळे, देवकाबाई खोटेले, अंगला वटी, जयवंता झोळे, रविना जांभुळकर, सुनिता कांबळे, पोलीस पाटील नचिकेत कापगते, शिक्षक प्रदीप ढवळे, पवन जांभुळकर, वैशाली राऊत, भुमिता शहारे उपस्थित होते.गोपाळ समाजाला नाथाची गरजदररोज गावोगावी फिरून भिक्षा मागणाऱ्या भटक्या जमातीच्या गोपाळ समाजबांधवाची चूल तुमच्या-आमच्या दिलेल्या मुठभर अन्नधान्यावरच पेटली जाते. सर्वत्र संचारबंदीत त्या ५ कुटुंबावर आघात होत आहे. त्यांना या स्थितीत मदतीसाठी आज ‘नाथा’ची गरज आहे. भिक्षा पात्रात आणणे व पानावर खाणारा हा गोपाळ समाज आजच्या परिस्थितीत भरडल्या जावू नये. यासाठी प्रशासनाने सुध्दा त्यांना मदत करण्याची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक