शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीला झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:47 IST

प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश: फेडरेशनच्या ७६ तर आविम ४१ केंद्रांना तूर्त परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : निवडणूक आचारसंहितेत अडकलेल्या खरीप हंगामाच्या आधारभूत धान खरेदी प्रक्रियेला मार्गी लावण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाला धान खरेदी करण्याच्या सूचना केल्या. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या १८० पैकी ७६ तर आदिवासी विकास महामंडळाच्या ४१ केंद्रांना परवानगी दिली आहे. उर्वरित केंद्रही लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.

पूर्व विदर्भात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यावर आहे. अल्प मुदतीच्या धानाची कापणी व मळणी सुरु झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी धानाची कापणी व मळणी केली. पण आधारभूत केंद्र सुरु न झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब माजी आ. राजेंद्र जैन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या खा. प्रफुल पटेल यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारसह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरु करण्याच्या सूचना केल्या. पण विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला होता. तरी खा. प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा सतत सुरु ठेवला. परिणामी पणन विभागाने धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. 

नोंदणी करून केंद्रावरच धान विक्री कराराजेंद्र जैन खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे धान खरेदीला सुरुवात झाली आहे. फेडरेशनच्या ७६ व आदिवासी विकास महामंडळाच्या ४१ केंद्रावर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. आतापर्यंत १४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी त्वरित नोंदणी करावी जेणे करून शेतकऱ्यांना लाभ घेता येईल, असे माजी आ. राजेंद्र जैन यांनी कळविले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाAgriculture Sectorशेती क्षेत्र