शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

अखेर शहरातील शाळांची घंटा वाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2021 5:00 AM

सालेकसा हायस्कूल सालेकसा येथे पं. स. चे गटशिक्षणाधिकारी एस. जी. वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य एस. जे. वैद्य यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वर्गात बसायला सांगितले. त्यापूर्वी सर्व पालकांचे संमतीपत्र आणि शाळेत येताच सॅनिटायझर, मास्कचा वापर, हात धुण्याची सोय इत्यादीची शहनिशा करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा :  दीड वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेतनंतर सोमवारी (दि. ४) प्रथमच सालेकसा शहरातल्या शाळा सुरू झाल्या असून शाळेची पहिली घंटा वाजताच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि उत्साह संचारल्याचे चित्र होते. तर विद्यार्थ्यांच्या आगमनाने शाळा आणि शहर गजबजल्या चित्र होते. हे चित्र जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये होते.  सालेकसा हायस्कूल सालेकसा येथे पं. स. चे गटशिक्षणाधिकारी एस. जी. वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य एस. जे. वैद्य यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वर्गात बसायला सांगितले. त्यापूर्वी सर्व पालकांचे संमतीपत्र आणि शाळेत येताच सॅनिटायझर, मास्कचा वापर, हात धुण्याची सोय इत्यादीची शहनिशा करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक ब्रजभूषण बैस, पर्यवेक्षक आर. बी. वैद्य व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोविड नियमांचा पालन करीत शाळा सुरू करण्यात आल्या. कोविड संसर्गाच्या भीतीमुळे सर्वत्र शाळा बंद होत्या. ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या होत्या. परंतु शहरी शाळांना सुरू करण्याचा निर्णय काही झाला नव्हता. शेवटी शासनाने ४ ऑक्टोबरचा मुहूर्त काढला आणि पालकांनी समाधान व्यक्त केला. शाळा सुरू होण्यापूर्वी पालकवर्ग सतत शिक्षक वर्गाला भेटून आपल्या पाल्याची चिंता करीत. शाळा केव्हा सुरू होणार सर, मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे प्रश्न करीत होते. परंतु आज शाळा सुरू होताच मुलांनी दप्तर घेऊन शाळेत जाताना पाहून समाधान व्यक्त केले.

५० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी- शाळेच्या पहिल्याच दिवशी सालेकसा हायस्कूल सालेकसा, पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा, वीर बिरसा मुंडा, जानकीबाई हायस्कूल शाळेत विद्यार्थी पोहोचले असून पहिल्याच दिवशी जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावली. यात मुलींचे प्रमाण जास्त दिसून आले.शिक्षणोत्सवाने विद्यार्थ्यांचे स्वागत - सोमवारपासून जिल्ह्यातील ११५९ शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रवेशव्दारावरच स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस शिक्षणोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५० टक्केच्यावर विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येसुध्दा उत्साह दिसून आला. 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या