शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

अखेर बिबट्या अडकला पिंजऱ्यात; गोंदिया जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 3:59 PM

सोनेगाव - तिडका मार्गावर बिबट जखमी असल्याची बातमी वनविभागाला सोमवारी सकाळी कळली. या बिबट्याला पकडण्यासाठी गोंदिया वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने तब्बल दोन तास परिश्रम घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: बोडगावदेवी वनक्षेत्रांतर्गत सोनेगाव -तिडका मार्गावरील बोदरा कक्ष क्र २७९ मध्ये सोमवारी सकाळी १२ वाजता जखमी बिबटला जेरबंद करण्यात आले. सध्या त्याला नवेगावबांध येथे नेण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला गोरेवाडा ( नागपूर )येथे नेले जाणार असल्याचे समजते. या बिबट्याला पकडण्यासाठी गोंदिया वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने तब्बल दोन तास परिश्रम घेतले. तो नेमका कशामुळे जखमी झाला ते वैद्यकीय परिक्षणानंतर कळेल.सोनेगाव - तिडका मार्गावर बिबट जखमी असल्याची बातमी वनविभागाला सोमवारी सकाळी कळली. लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी बी टी दुर्गे आपल्या सहकाऱ्यांसह बोदरा जंगलात गेले. रस्त्याच्या कडेला असलेल्या टी सी एम नालीत बिबट बसलेला दिसून आला. त्याची हालचाल होत नसल्याने तो जखमी झाला असावा असा तर्क काढण्यात आला. काही वेळातच त्याने समोरच्या पायांचा आधार घेत सरपटत नालीचा उंचवटा ओलांडला. त्याच्या या हालचालीवरून तो पायाने चालू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. त्याला पिंजऱ्यात अडकविण्यावर शिक्कामोर्तब केले. लगेच नवेगावबांध येथून पिंजरा बोलावण्यात आला व त्या बिबटला अलगद पिंजऱ्यात कैद करण्यात शीघ्र कृती दलाला यश आले. या बिबटचे वय सुमारे अडीच ते तीन वर्षे असल्याचे समजते. तो बिबट वाहनाच्या धडकेत, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात की आजारपणामुळे जखमी झाला ते अद्याप स्पष्ट झाले नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर त्याचा उलगडा होणार आहे. बिबट बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावर नियंत्रण राखण्यात स्थानिक पोलिसांनी चोख भूमिका बजावली.

ही मोहीम यशस्वी करण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी बी टी दुर्गे, क्षेत्र सहाय्यक उमेश गोटेफोडे, वेलतुरे, शीघ्र कृती दलाचे क्षेत्र सहाय्यक राजेंद्रसिंग बहुरे, मिथुन चव्हाण, चंद्रकांत गोडे, प्रवीण केळवतकर, दीपक बरडे, मुकेश सोनवाने, धार्मिक तसेच वन कर्मचा?्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :leopardबिबट्या