राजकुमार भगत।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असून या गावात ३ स्वस्त धान्य दुकान आहे. सध्या ज्या दुकानदाराला ही दुकाने धान्य वाटप करायला दिली होती. त्या दुकानदाराने ग्राहकांशी अरेरावी केल्यामुळे सदर ग्राहकांनी तहसीलदार उषा चौधरी यांच्याकडे तक्रार करुन लोकमत प्रतिनिधीकडे आपली आपबिती सांगितली. दरम्यान या संबंधिचे वृत्त सोमवारच्या (दि.१३) अंकात प्रकाशित होताच सकाळी ९ वाजतापासून मोफत धान्य वाटपाला सुरुवात केली.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात सध्या सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व रोजगाराची साधने सर्वच ठप्प आहे. अशात गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने अंत्योदय,बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहचवून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.बऱ्याच स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाकडून मिळणारे मोफत तांदूळ वाटप करायला सुरुवात केली होती. परंतु सडक-अर्जुनी येथे १२ एप्रिलपर्यंत मोफत तांदूळ वाटप करण्यात आले नव्हते. ग्राहकांनी भ्रमणध्वनीद्वारे वितरकाला तांदूळ वाटपाबाबत विचारणा केली असता त्याने ग्राहकांनाच िअरेरावीची भाषा वापरुन अपमानित केले. याची आपबिती शिधापत्रिकाधारकांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले.दरम्यान यासंदर्भातील वृत्त सोमवारी प्रकाशीत होताच स्वस्त धान्य दुकानदाराने अन्नधान्याचे वाटप करण्यास सकाळपासूनच सुरूवात केली. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.मोफत तांदूळ लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्वस्त धान्य वाटप करणाºया दुकानदारांकडून ग्राहकांना सुविधा मिळते किंवा नाही याची चौकशी प्रशासनाने करणे गरजेचे आहे.लाभार्थ्यांनी मानले लोकमतचे आभारशासनाकडून मिळणारे प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ आता आपल्याला मिळणार किंवा नाही अशा मनस्थितीत शिधापत्रिकाधारक होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर मोफत धान्य वाटपाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक नागरिकांनी भ्रमणध्वनीवरुन फोन करुन लोकमतचे आभार मानले.सुविधांचा अभाववडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार सडक-अर्जुनी येथील ३ दुकानाचे वाटप एकाचवेळी करीत असल्यामुळे ग्राहकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय शिधापत्रिकाधारकांना उन्हात उभे राहावे लागते.तिथे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. मंडप,पिण्याचे पाणी, सॅनिटायझर या सुविधांपासून नागरिक वंचित आहेत.
अखेर मोफत धान्य वाटप सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात सध्या सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व रोजगाराची साधने सर्वच ठप्प आहे. अशात गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने अंत्योदय,बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहचवून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
अखेर मोफत धान्य वाटप सुरु
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल : सुविधांचा अभाव शिधापत्रिकाधारकांची ओरड