शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सीईओंनी दिले लघुपाटबंधारे विभागाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला जिल्हा निधी व इतर निधी शासनाकडून ३३ टक्क्यांच्या तुलनेत कमी प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात सरकारच्या उत्पन्नात तूट असल्याने ती तूट भरुन काढण्यासाठी सरकारने एकतर अखर्चित निधी ३१ मे पर्यंत परत मागविला. जिल्हा निधीमध्ये सुध्दा अपेक्षित उत्पन्न जमा होण्याची शक्यता कमी असल्याने अंदाजपत्रकाप्रमाणे काम करणे शक्य होणार नसल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्दे३३ टक्क्यांवरील कामाचे नियोजन नको : अधिकाऱ्यांना फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या नियोजनामुळे शासन निर्णयाची झालेली अवहेलना आणि सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही बांधकाम व लघुपाटबंधारे विभागावर सुरू असलेले दबावतंत्र मागील आठवडाभरापासून टीकेचे लक्ष्य ठरले आहे.या सर्व प्रकाराची जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दखल घेत सर्वच विभागप्रमुखांसह अध्यक्ष व पदाधिकाºयांना पत्र देत २०२०-२१ च्या अंदाजपत्रकातील प्रत्यक्ष उपलब्ध तरदुतीच्या आधारे पहिल्या टप्यात फक्त ३३ टक्के मर्यादेच्या कामाचे नियोजन करुन कार्यारंभ आदेश देण्याचे निर्देश दिले आहे.यासंबंधिचे आदेश जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांनी लेखी स्वरुपात १५ जून रोजी आदेश निर्गमित केल्यामुळे ३३ टक्केऐवजी १०० टक्के कामाचे नियोजन करणाऱ्या विभागासह जि.प.पदाधिकारी व या कामांना जबरदस्तीने नियोजनात घालण्यासाठी दबावतंत्राचा वापर करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. सेवानिवृत्त झालेल्या त्या अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेतील संपुर्ण घडामोडीची माहिती पुरविण्याचे काम वित्त विभागातील एक कर्मचारी करीत असल्याची चर्चा आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला जिल्हा निधी व इतर निधी शासनाकडून ३३ टक्क्यांच्या तुलनेत कमी प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात सरकारच्या उत्पन्नात तूट असल्याने ती तूट भरुन काढण्यासाठी सरकारने एकतर अखर्चित निधी ३१ मे पर्यंत परत मागविला. जिल्हा निधीमध्ये सुध्दा अपेक्षित उत्पन्न जमा होण्याची शक्यता कमी असल्याने अंदाजपत्रकाप्रमाणे काम करणे शक्य होणार नसल्याचे म्हटले आहे.यामुळे अधिकारी व पदाधिकारी यांचे चांगलेच धाबे दणाणले असून ज्या कंत्राटदारांनी काम विकत घेतले आहे, त्यांचीही अडचण यामुळे झाली आहे. लघु पाटबंधारे विभागाने गेल्या आर्थिक वर्षात दीडपट केलेल्या नियोजनाचे साडेआठ कोटी रुपयांचे कामाचे टेंडर मात्र आॅनलाईन केले आहे.या विभागाच्यावतीने यावर्षीचे नियोजन केले गेले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी लघुपाटबंधारे विभागासोबतच बांधकाम विभागात नियोजनात चांगलेच पाणी मुरल्याने कामे घेण्याºया कंत्राटदारांची फजिती होणार आहे. एकाच कामाचे दोन प्रशासकीय मान्यता पत्र निघत असल्याने खरा पत्र कुठला असाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.या सर्व परिस्थितीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत पदाधिकारी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प