शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लाखांदूर तालुका कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामातील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा ...

Farming for the upliftment of farmers | शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीशाळा

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीशाळा

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला अधिकारी शेताच्या बांधावर : पट्टा पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखांदूर तालुका कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामातील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा कार्यशाळेचे आयोजन लाखांदूर तालुक्यातील चिंचगाव येथे करण्यात आले होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी, छाया कापगते, मंडळ कृषी अधिकारी बी. ए. शेन्नेवाड, कृषी पर्यवेक्षक एच. के. रामटेके, एस. पी. वरकडे, कृषी सहायक बगमारे, देशमुख, कापगते, शिवनकर, कोटांगले उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी छाया कपगते यांनी तुडतुडा पिकाने लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या तुडतुड्याच्या नुकसानीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पट्टा पध्दतीचा अवलंब केल्यास नक्कीच धानपिकावर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो, असे मार्गदर्शनातून सांगितले. यावेळी मार्गदर्शनात कापगते यांनी प्रत्यक्ष बाधीत उतरुन धानपिकातील किडींचे प्रात्याक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविले.
मंडळ कृषी अधिकारी बी. ए. शेन्नेवाड यांनी शेतकऱ्यांना शेतीचे अर्थशास्त्र समजावून शेती हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी शेतीला जोडधंदा सुरु करण्याचे आवाहन केले. तरच आपण विषमुक्त शेती पिकवून देशाला सक्षम करु शकतो असे सांगितले. त्यानंतर पर्यवेक्षक एच. के. रामटेके यांनी प्रास्ताविकातून मार्गदर्शन केले.
यावेळी काही प्रगतशील शेतकऱ्यांनी स्वत: अनुभव घेतलेल्या पट्टा पध्दतीविषयी अनुभव सांगितले. अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने राज्यांतर्गत अभ्यासदौऱ्यासाठी पाठविणार असल्याचेही कापगते यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. तालुक्यातील पट्टा पध्दतीच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल रोगकीडींचा प्रादुर्भावही कमी असल्याने उत्पन्नात नक्कीच वाढ होईल असे कार्यशाळेतून सांगितले.
कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावातील मंडळीसह, शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक एच. के. रामटेके यांनी तर आभार पर्यवेक्षक एस. पी. वरकडे यांनी मानले

पट्टा पद्धतीचा शेतकºयांना दिलासा
दरवर्षी लाखांदूर तालुक्यात तुडतुड्याने धानपिकाचे नुकसान टाळण्यासाठी लाखांदूरच्या तालुका कृषी अधिकारी कापगते यांनी तालुक्यातील पट्टा पध्दतीचे क्षेत्र वाढवले अन् हीच पध्दत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली असून त्यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली असून शेतकऱ्यांनी कार्यशाळेत पट्टा पध्दतीचे फायदे अनुभवातून सांगितले. त्यामुळे तालुक्यातील पट्टा पध्दतीचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येते.

Web Title: Farming for the upliftment of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती