शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही.

ठळक मुद्देधानपिक नुकसानीच्या सर्वेक्षणानंतरही मदत नाही : शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पूरबाधित व्यक्तींन आणि पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना ६९ कोटी रुपये मंजूर केले. मात्र गोंदिया जिल्ह्यात आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण होऊनही मदत देण्यात आली नाही.या प्रकारामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही. परंतु त्यांच्या पिकांची अतिवृष्टी व पुरामुळे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना कमाल हेक्टरच्या मर्यादेत शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीनुसार अनुज्ञेय असलेल्या मदत दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी मागणी केलेला ६८ कोटी ९४ लक्ष २७ हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसानीचा लाभ मिळणार आहे. मात्र ऑगस्ट व सप्टेंबर २०१९ या महिन्यात गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर हानीमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली.संबंधित विभागाद्वारे नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल सादर करण्यात आला. यात जानवा, येगाव, खामखुरा, इसापूर, इटखेडा, डोंगरगाव, महागाव, सिरोली, नवनीतपूर, काटगाव, वडेगावबंध्या, बोळदे, करडगाव, माहूरकुडा, मालकनपुर, निलज, रामघाट, तुमडीमेंढा, गवरा भरनोली, केशोरी, परसोडी रयत, सिलेझरी अशा २३ गावातील ४५२ शेतकºयांच्या ६६.४८ हे आर शेतातील ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. तर या सर्व गावातील १०५.२९ हे.आर. शेत जमिनीतील धान पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सादर करण्यात आला. आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोंदिया तालुक्यात सुमारे १२०० हे.आर. शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यासाठी १.७५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.एवढे असतानाही शासनाने १७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयात जी मदतीची आकडेवारी दर्शविण्यात आली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्याला वगळण्यात आले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कालावधीत जिल्ह्यातील इतर तालुक्यात नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हानिहाय मिळालेल्या निधीचा गोषवारानागपूर      ९२०९८०० कोटीवर्धा           ३६७२०००भंडारा       ८३६५४०००गोंदिया     ०००००००चंद्रपूर        २०८१७००००गडचिरोली   ३०१८३३०००