शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
2
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
3
बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?
4
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
5
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
6
"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
7
"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
8
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
9
Astro Tips: कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारीच का फेडावा? जाणून घ्या ज्योतिषीय आणि धार्मिक कारण!
10
पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
11
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
12
"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
13
IND vs SA : गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी शास्त्रींचा टीम इंडियाला 'अजब-गजब' सल्ला; म्हणाले...
14
अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य
15
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex १९५ अंकानी वधारला; Nifty २६,१०० च्या पार, 'या' शेअर्समध्ये तेजी
16
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
17
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
18
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
19
भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
20
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

मक्याच्या शेतीतून शेतकरी होतोय सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:06 IST

येथील प्रगतीशील शेतकरी उमेदलाल जैतवार यांनी केवळ तीन महिन्याच्या कालावधीतच दोन हेक्टरमध्ये मक्याची लागवड करुन त्यातून तीन लाख रुपयांचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देपाच एकरात अडीच लाखाचे उत्पन्न : तीन महिन्यातच तीन लाखांचे घेतले उत्पादन

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : येथील प्रगतीशील शेतकरी उमेदलाल जैतवार यांनी केवळ तीन महिन्याच्या कालावधीतच दोन हेक्टरमध्ये मक्याची लागवड करुन त्यातून तीन लाख रुपयांचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.उमेदलाल जैतवार यांच्याकडे जुना सालेकसा परिसरात एकूण आठ एकर शेती आहे. त्यांनी या ठिकाणी फार्म हाऊस तयार केला आहे. कृषी कौशल्याच्या उपयोग करीत दर वर्षी एकाच जमिनीवर वर्षातून तीनदा वेगवेगळे पीक घेण्याचा प्रयोग ते करीत आहे. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना बगल देत मका, काकडी, तूर, कारल्या, वाल, चवळी आदी पिकांची लागवड केली. मागील तीन वर्षापासून डिसेंबर जानेवारी ते मार्च दरम्यान मका, एप्रिल मे दरम्यान काकडी आणि जून ते सप्टेंबर, आॅक्टोबर दरम्यान वाल, कारल्या, तूर या पिकांच्या लागवडीचा प्रयोग राबवित आहे. यामध्ये प्रत्येक हंगामात लाखाचे उत्पन्न प्राप्त करुन वर्षाअखेर ९ ते १० लाखाचे उत्पादन घेत असून यातून त्यांना पाच ते सहा लाख रुपयांचा शुध्द नफा सुध्दा मिळत आहे. यामुळे गावातील २० ते २५ महिला पुरुष मजुरांना वर्षभर रोजगार सुध्दा मिळत आहे. जैतवार यांनी दोन हेक्टर जमिनीवर मक्याचे उत्पादन घेऊन प्रती एकर सरासरी ३५ क्विंटल मक्याचे उत्पादन घेतले. त्याची एकूण किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. मक्याच्या कडबा सुध्दा विक्री करीत आहेत.पाणी व खताची बचतमक्याच्या शेतीला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जमिनीत ओलावा ठेवण्यासाठी फक्त तीन ते चार वेळा थोडसेच पाणी द्यावे लागते. त्यामुळे पाण्याची व विजेची सुध्दा बचत होते. तसेच मक्याच्या शेतीला एक किंवा दोन वेळा थोड्या प्रमाणात युरियाची मात्रा द्यावी लागते. रोगांचा किंवा किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे खतासह कीटकनाशक औषधीचा सुध्दा खर्च येत नाही. त्यामुळे मक्याची शेती जास्त फायदेशीर ठरत आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतमागील दोन तीन वर्षांपासून धान उत्पादक शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. तर लागवड खर्च वाढला असल्याने धानाची शेती तोट्याची होत चालली आहे. त्यामुळे अशात कमी खर्चाची आणि कमी कालावधीत येणाऱ्या मक्याची शेती फायदेशीर ठरु शकते.महाराष्ट्र दर्शनातून मिळाली प्रेरणाकमी खर्चातून अधिक उत्पादन घेण्याची शेती कशी करायची याची प्रेरणा त्यांना महाराष्ट्र दर्शनाच्या माध्यमातून मिळाली. जैतवार यांना आधीपासूनच कृषी कार्य करण्याची आवड असल्याने शेती विषयक पत्रिका वाचनाची सवय लागली. यातून त्यांना पिकांबद्दल माहिती मिळत गेली. २००७ मध्ये कृषी विभागामार्फत कृषी विषयक अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला. या दरम्यान महाराष्ट्र दर्शन करीत विविध पिकांची प्रत्यक्ष पाहणी व प्रात्यक्षिके पाहणी करण्यास मिळाले. याचीच त्यांना मदत झाली.

टॅग्स :Farmerशेतकरी