शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, अर्ज करा अन् घ्या योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:12 IST

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकरी : विशेष पंधरवाडा मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मोहीम स्वरुपात राबविण्याकरिता तसेच वनपट्टे जमीन असलेल्या आदिवासी कुटुंबांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता क्षेत्रीय स्तरावरून २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष पंधरवाडा मोहीम सुरू झाली आहे. 

या मोहिमेत कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https:// mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे.

फलोत्पादन पिकाचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगिण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपरिक उत्पादन पद्धतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे इत्यादी या योजनेचे उद्दिष्ट आहे. 

कुठे कराल अर्ज शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन संकेत- स्थळावर जाऊन अर्ज करावेत. ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतरच प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत पूर्वसंमती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी कळविले आहे.

या योजनेचा घेता येणार लाभ एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम- सुटी फुले, मसाला पिके लागवड- हळद लागवड, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण- ट्रॅक्टर संरक्षित शेती- हरितगृह, प्लास्टीक मल्चिंग, कांदाचाळ, मधुमक्षिका पालन- मधुमक्षिका वसाहत संच वाटप, काढणीपश्चात व्यवस्थापन- पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्वशितकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतसाखळी, शीतवहन, रायपनिंग चेंबर इत्यादी घटकांकरिता अनुदान देय आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgondiya-acगोंदियाfarmingशेतीFarmerशेतकरी