शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पीक कर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:09 IST

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीतील घोळ संपलेला नाही. त्याचाच फटका नवीन पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देयाद्यांनी वाढविली चिंता : बँका उद्दिष्टापासून लांबच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीतील घोळ संपलेला नाही. त्याचाच फटका नवीन पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. खात्यावरील आधीचे कर्ज शून्य न झाल्याने बँका नवीन पीक कर्ज देण्यास टाळटाळ करीत असल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ७० हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. यासाठी शासनाने यंदा खरीप हंगामात जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना एकूण २७६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. मात्र जुलै महिना अर्धा संपला असताना बँकानी अद्यापही पीक कर्ज वाटपाचे अर्धे सुध्दा उद्दिष्ट पूर्ण केले नाही.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आत्तापर्यंत १९ हजार २२० शेतकऱ्यांना ७३ कोटी रुपयांचे तर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकानी केवळ ३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकानी वाटप केलेल्या पीक कर्जाची बेरीज केल्यास ११० कोटी रुपयांच्या पलिकडे हा आकडा जात नाही. त्यामुळे बँकाना पीक कर्जाचे अर्धे सुध्दा उद्दिष्ट गाठता आले नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी असून दरवर्षी यापैकी ७० ते ८० हजार शेतकरी पीक कर्जाची उचल करतात. मात्र यंदा खरीप हंगामाला सुरूवात होवून दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर केवळ २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया किती गतीने सुरू आहे याची कल्पना न केलेली बरी. राष्ट्रीयकृत बँकाच्या पायऱ्या झिजवून देखील पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत चालली आहे. तर दुसरीकडे बँका आमचे काम सुरळीत सुरू असल्याचा दावा करीत आहे. पीक कर्ज वाटपाचे पाणी नेमके कुठे मुरत आहे हे न समजण्यापलीकडे आहे.महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंबकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांची दहावी ग्रीन यादी अद्यापही बँकाना महाआॅनलाईनकडूृन प्राप्त झाली नाही. त्यामुळे जवळपास २० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरील कर्जाची रक्कम शून्य होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देता येत नाही. तर शेतकऱ्यांनी थकीत कर्ज भरल्यास त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. दरम्यान महाआॅनलाईनकडून याद्या प्राप्त पाठविण्यास विलंब होत असल्याने पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत आहे.पीक कर्ज वाटप मेळावे नावापुरतेचखरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध व्हावे, त्यांना सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ येवू नये, यासाठी बँकातर्फे तालुका स्तरावर पीक कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले. मात्र यानंतर पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकाना गाठता आले नाही. त्यामुळे पीक कर्ज वाटप मेळावे घेवून बँकानी नेमके काय साध्य केले असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.त्या शेतकऱ्यांचे कायकर्जमाफीच्या ग्रीन यादीत शेतकऱ्यांची नावे नसताना त्यांची दिशाभूल करुन थकीत कर्जाची रक्कम भरायला लावण्यात आल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार, बोदलकसा, सुकडी डाकराम या गावांमध्ये घडला. मात्र आता या शेतकऱ्यांची नावे ग्रीन यादीत नसल्याने व जवळ असलेली सर्व जमापुंजी व उधार उसनवारी करुन कर्जाची रक्कम भरली. आता नवीन पीक कर्ज मिळणार नसल्याने खरीप हंगाम करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.