लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कृ षी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांनी शेतीत या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी असे प्रतिपादन जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने यांनी केले.तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्तवतीने कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपनिमित्त पंचायत समिती सभागृहात मंगळवारी (दि.७) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, कृषी विकास अधिकारी मनोहर मुंडे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नीरज जागरे, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक उदय खर्डेनवीस, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी अधिकारी रहांगडाले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनील खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी सभापती सोनवाने यांनी, जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची तसेच शहीद बिरसा मुंडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजनेची माहिती दिली. घोरपडे यांनी, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तसेच शेतकऱ्यांच्या पीक वाढीकरीता कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच धान पिकावर येणाऱ्या किड व रोगांचे नियंत्रण कसे करावे यावर मार्गदर्शन केले.खोडकिडा नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी धानाच्या नर्सरी व बांधीमध्ये कामगंध सापळ््यांचा वापर करावा, त्यामुळे खोडिकडीचा प्रादुर्भाव भविष्यात कमी होईल असे सांगितले. तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजनेची माहिती देवून योजनेत सहभागी होण्यास सांगीतले. मुंडे यांनी, जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.जागरे यांनी, नाबार्डच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. खर्डेनवीस यांनी बँकांमार्फत शेतकऱ्यांकरीता राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक पाटील यांनी मांडले. संचालन तुमडाम यांनी केले. आभार रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.कामगंध सापळ््यांचे प्रात्यक्षिककृषी संजीवनी सप्ताहांतर्गत कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना कामगंध सापळ््यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, या कार्यक्रमांतर्गत उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक वामन टेंभूर्णे व कृषी सहायक दांडगे यांनी कामगंध सापळ््याबद्दल सविस्तर माहिती देत त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करु न शेती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST
कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना कामगंध सापळ््यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, या कार्यक्रमांतर्गत उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक वामन टेंभूर्णे व कृषी सहायक दांडगे यांनी कामगंध सापळ््याबद्दल सविस्तर माहिती देत त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करु न शेती करा
ठळक मुद्देशैलजा सोनवाने : जिल्हास्तरीय कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप