शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

राज्य परिवहन मंडळाने पुन्हा वाढविले प्रवासभाडे

By admin | Updated: June 2, 2014 01:25 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा प्रवास भाड्यात वाढ केली आहे.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा प्रवास भाड्यात वाढ केली आहे. हे नवीन प्रवास भाडे ३१ मेच्या रात्री १२ वाजताच्या नंतरपासून लागू करण्यात आले आहे.

परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा वाढविलेल्या प्रवास भाड्याचे कारण म्हणजे डीझेलच्या किंमतीत झालेली वाढ, टायरच्या वाढलेल्या किंमती व एसटीच्या कर्मचार्‍यांची करण्यात आलेली १0 टक्के वेतन वाढ, अशी आहेत. या प्रवास दरवाढीचा प्रभाव साधारण व जलद बसमधील प्रवाशांवर कमी पडेल. मात्र एशियाडमध्ये प्रवास करणार्‍यांना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. आधी सहा किमी. वर साधारण व जलद बसची सेवा घेणार्‍या प्रवाशांना ६.0५ रूपये भाडे द्यावे लागत होते. आता ६.२0 रूपये भाडे द्यावे लागेल. एशियाडच्या प्रवाशांना पूर्वी सहा किमी.वर ८.२0 रुपये शुल्क लागत होते. आता त्यांना ८.४५ रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. अशाप्रकारे साधारण व जलद बस सेवेसाठी प्रवाशांना केवळ १५ पैसे शुल्क वाढविण्यात आले आहे. तर एशियाडच्या प्रवाशांना २५ पैसे अधिकचे द्यावे लागणार आहेत.

कोठून किती लागणार भाडे?

गोंदिया आगारातून मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया ते तिरोडा, तुमसर, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव व रजेगावसाठी केवळ १-१ रूपयाची वाढ तिकीट दरात करण्यात आली आहे. तिरोड्यासाठी पूर्वी ३0 रूपये, आता ३१ रूपये. तुमसरसाठी पूर्वी ६१ रूपये, आता ६२ रूपये. आमगावसाठी पूर्वी ३६ रूपये, आता ३७ रूपये, सालेकसासाठी पूर्वी ४९ रूपये, आता ५0 रूपये. देवरीसाठी पूर्वी ६६ रूपये, आता ६७ रूपये. गोरेगावसाठी पूर्वी १८ रूपये, आता १९ रूपये. साकोलीसाठी पूर्वी ६७ रूपये, आता ६८ रूपये प्रवास भाडे राहणार आहे. गोंदिया ते भंडार्‍यासाठी पूर्वी १0८ रूपये भाडे घेतले जात होते. आता ११२ रूपये घेण्यात येतील. गोंदिया ते नागपूरसाठी १६९ रूपये घेतले जात होते, आता १७४ रूपये घेतले जातील. गोंदिया ते रजेगावच्या सीमेपर्यंत पूर्वीपेक्षा एक रूपया अधिक घेण्यात येईल. तिरोडा आगाराचे व्यवस्थापक एम.डी. नेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण बससाठी तिरोडा-गोंदियासाठी पूर्वी ३0 रूपये भाडे होते. आता एक रूपया वाढ झाली आहे. तिरोडा ते तुमसर व भंडार्‍यासाठीसुद्धा एक-एक रूपया दरवाढ करण्यात आली आहे.

इच्छा तेथे प्रवास’ सात दिवसांच्या पास प्रवासासाठी पूर्वी साधारण बससाठी एक हजार ३६0 रूपये आकारले जात होते. आता एक हजार ४00 रूपये लागणार आहेत. निमआराम बसची सेवा पूर्वी सात दिवसांसाठी एक हजार ६0५ रूपयात उपलब्ध होत होती. आता एक हजार ७६0 रूपये द्यावे लागतील. चार दिवसांच्या साधारण बससेवेसाठी पूर्वी ७८0 रूपये शुल्क होते. आता ८00 रूपये घेण्यात येतील. निमआराम बससेवेसाठी पूर्वी ८९५ रूपये घेण्यात येत होते. आता ९२0 रूपये वसूल केले जातील. प्रासंगिक करारात कसलीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यात आतासुद्धा प्रति किमीचे ४६ रूपये घेतले जातील. पुन्हा एकदा झालेल्या दरवाढीमुळे प्रवाशांवर अधिकचा भुर्दंड बसणार आहे. (प्रतिनिधी)