शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

होम मिनिस्टर फिट तर कुटुंब सुपरहिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 5:00 AM

महिलांचे आरोग्य सुदृढ राहिले तर कुटुंबाचे आरोग्यही निरोगी राहते. पण दिवसेंदिवस आधुनिक पद्धतीचा उपयोग घरच्या आहारात केल्या जातो. सामाजिक कार्यकर्ता, नोकरदार, गृहिणी कामाच्या व्यस्ततेत आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच महिलांमध्ये लठ्ठपणा, शारीरिक कमजोरी तथा अनेक समस्यांना सामोर जावे लागते. वेळेवर उपचार न झाल्याने गंभीर आजारालासुद्धा बळी पडावे लागते.

ठळक मुद्देसायकल चालवून महिला दिन साजरा : ‘एक दिन सायकल के नाम’ उपक्रमाला महिलांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : होम मिनिस्टर म्हणून महिलांना संबोधल्या जाते, ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी शहरातील अनेक महिलांनी महिला दिवस साजरा करण्यासाठी ‘एक दिन सायकल के नाम’ या उपक्रमात सहभागी होऊन सायकल चालवून पर्यावरण संवर्धन आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. हा उपक्रम प्रथमच शहरात आयोजित करण्यात आला होता. महिलांचे आरोग्य सुदृढ राहिले तर कुटुंबाचे आरोग्यही निरोगी राहते. पण दिवसेंदिवस आधुनिक पद्धतीचा उपयोग घरच्या आहारात केल्या जातो. सामाजिक कार्यकर्ता, नोकरदार, गृहिणी कामाच्या व्यस्ततेत आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच महिलांमध्ये लठ्ठपणा, शारीरिक कमजोरी तथा अनेक समस्यांना सामोर जावे लागते. वेळेवर उपचार न झाल्याने गंभीर आजारालासुद्धा बळी पडावे लागते. याचीच दखल घेत महिलांनी एकत्रित येऊन आपले आरोग्य निरोगी रहावे, यासाठी ‘एक दिन सायकल के नाम’ या उपक्रमात सहभाग महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सायकल चालवून पर्यावरण संवर्धन, आरोग्य व महिला दिनाचा संदेश घराघरापर्यंत पोहचविला. या उपक्रमात शहरातील प्रसिध्द डॉक्टर, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, गृहिणी सहभागी झाल्या होत्या. सायकल चालवून महिला फिट तर कुटुंब सुपरहिट असा संदेश दिला आहे. 

तीन वर्षांपासून विविध उपक्रम विशेष म्हणजे की ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम मागील तीन वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दर रविवारी सायकल चालवून पर्यावरण व आरोग्याचा संदेश दिला जातो. या उपक्रमात जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरम यांचा मोलाचा वाटा आहे. खर्चाची बचत व आरोग्यासाठी लाभदायकसायकल चालविण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु आरोग्यासह खर्चाची ही बचत सायकलमुळे होत आहे. सायकल चालविल्याने शरीराची संपूर्ण हालचाल होत असल्याने आरोग्य निरोगी राहते. प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सायकलचा अधिकचा वापर केला तर इंधन बचतीसह खर्चाची ही मोठी बचत प्रदूषण कमी करण्यास सुध्दा मदत होते. इंधनाचे भाव गगनाला भिडत आहेत. अशात इंधन बचतीसाठी सायकल हा उत्तम पर्याय आहे.

 

टॅग्स :Womenमहिला