शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला पिकातून सावरले कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

परिसरात शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने शेती आजघडीला परवडत नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्जुनी-मोरगाव अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून शेतकरीबांधवाना वेळोवेळी मार्गदर्शन करुन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. समुदाय कृषी व्यवस्थापकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना पुढे आणून त्याच्या कुटुंबाचा सर्वागिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देदुर्गाची हिम्मत : ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने दिला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : ग्रामीण भागातील महिला स्वयंपूर्ण होऊन स्वत: आत्मनिर्भर व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्जुनी-मोरगाव अंतर्गत विविध उपक्रम राबवून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण सक्षम करुन आत्मनिर्भर करण्याचे धडे दिले जाते. बाक्टी येथील मध्यम कुटूंबातील दुर्गाला समुदाय कृषी व्यवस्थापकाच्या माध्यमातून शेती विषयक प्रबोधन यशोशिखरावर नेणारा ठरले. ५० वर्षीय दुर्गाने बचत गटातून आर्थिक मदत घेऊन भाजीपाल्याच्या शेती करण्यासाठी पुढे आली. भाजीपाल्याचे पीक घेऊन त्या भरोशावर दुर्गाबाईनी मिळालेल्या मिळकतीतून अख्ये कुटुंब सावरले.परिसरात शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने शेती आजघडीला परवडत नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्जुनी-मोरगाव अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून शेतकरीबांधवाना वेळोवेळी मार्गदर्शन करुन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. समुदाय कृषी व्यवस्थापकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना पुढे आणून त्याच्या कुटुंबाचा सर्वागिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.अवनी ग्रामसंघाने बाक्टी येथील दुर्गा भाष्कर हेमने या ५० वर्षीय महिला शेतकऱ्यांच्या कुटूंबाचा कायापालट करुन उमेद अभियानात एक प्रगतीशिल आशेचा किरण ठरला. अभियानाचे तालुका व्यवस्थापक रेशीम नेवारे यांच्या मार्गदर्शनात बोंडगावदेवी येथे स्वराज प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली.सदर प्रभागात १६ ग्रामसंघ असून ३२८ महिला बचत गटाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंरोजगार करण्यासाठी पुढे यावे म्हणून वेळोवेळी महिलांना प्रशिक्षण दिले जाते. वारंवार धानाचे पीक न घेता नगदी पैसा मिळवून देणारी भाजीपाला शेती करुन कुटुंबाचा सर्वागिण विकास साधा असा मौलिक हितोपदेश गटाच्या महिलांना दिला जातो. सामुदायीक कृषी व्यवस्थापक सुरेश डोंगरवार यांनी बाक्टी-चान्ना येथील दुर्गा हेमने या शेतकरी महिलेला ग्रामसंघात जुळवून घेतले. भाजीपाला पिकाविषयी दुर्गाला मार्गदर्शन केले. धानाच्या शेतीला पर्यायी जोडधंदा म्हणून भाजीपाला शेती करण्याचे मनोमन ठरविले. दुर्गाने दुसºयाची शेती दहा हजाराच्या मोबदल्यात भाड्याने घेतली.धम्मज्योती बचत गटाच्या माध्यमातून पैशाची उचल केली. भाजीपाला लावला त्यात टमाटर, मिरची, पत्ताकोबी, फुलकोबी, वांगे यासारखे नगदी पिके लावली. भाजीपाला शेती बहरली, उत्पादन हातात आले. बाजारात माल गेला पैसा हाती आला. दुर्गाने आपले कुटुंब सावरले. भाजीपाला विक्री सुरु आहे. उत्पादन येत आहे. गटाच्या माध्यमातून मला आधार मिळाल्याचे दुर्गा हेमणे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी