लोकमत न्यूज नेटवर्क्नगोरेगाव : कौटुंबिक वादातून एकाने स्वत:च्याच घराला आग लावल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याची घटना गुरूवारी (दि.१८) सकाळी तालुक्यातील रामाटोला (मलपुरी) येथे उघडकीस आली. या घटनेमुळे दोन्ही भावांच्या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. याप्रकरणी धनलाल रहांगडाले यांच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहितीनुसार रामटोला येथील रहिवासी धनलाल रहांगडाले यांचा मुलगा व्यकंट रहांगडाले यांनी बुधवारी (दि.१७) रात्री कुटुंबियासह वाद घातला. त्यामुळे वडील धनलाल रहांगडाले, त्यांचा लहान भाऊ आणि पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्य बाहेरगावी गेले होते. याच दरम्यान संतापलेल्या व्यंकट रहांगडाले यांने स्वत:च्याच घराला आग लावली. घराला आग लावण्यापूर्वी त्यांनी घरातील गॅस सिलिंडर मात्र घराबाहेर काढून ठेवला होता. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाले होते. गावातील नातेवाईकांनी याची माहिती धनलाल रहांगडाले यांना दिली.यानंतर त्यांनी कुटुंबीयांसह आपले गाव गाठून याची गोरेगाव पोलिसांना तक्रार केली. रहांगडाले यांनी केलेल्या तक्रारीनुसार घरातील सर्व साहित्य, रोख रक्कम, वर्षभराचे साठवून ठेवलेले अन्नधान्य,फर्निचर सह घरातील कपड्यांसह सर्वच साहित्य जळून राख झाले. त्यामुळे भर पावसाळ्यात त्यांच्या कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. गोरेगाव पोलिसांनी तक्रारीवरुन व्यंकट रहांगडाले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
कौटुंबिक वादातून स्वत:च्याच घराला लावली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST
प्राप्त माहितीनुसार रामटोला येथील रहिवासी धनलाल रहांगडाले यांचा मुलगा व्यकंट रहांगडाले यांनी बुधवारी (दि.१७) रात्री कुटुंबियासह वाद घातला. त्यामुळे वडील धनलाल रहांगडाले, त्यांचा लहान भाऊ आणि पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्य बाहेरगावी गेले होते. याच दरम्यान संतापलेल्या व्यंकट रहांगडाले यांने स्वत:च्याच घराला आग लावली. घराला आग लावण्यापूर्वी त्यांनी घरातील गॅस सिलिंडर मात्र घराबाहेर काढून ठेवला होता.
कौटुंबिक वादातून स्वत:च्याच घराला लावली आग
ठळक मुद्देकुटुंब आले उघड्यावर : रामाटोला येथील घटना, गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल