लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शहरात शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. मागील दोन दिवस ही मोहीम शहरातील विविध भागात राबविण्यात आली.त्यानंतर सोमवारपासून (दि.१३) ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती आहे.शहरातील गोरेलाल चौक, नेहरु प्रतिमा, चांदणी चौक, रेल्वे स्टेशन रोड, दुर्गा चौक, गांधी प्रतिमा या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा व्यवसायीकांनी अतिक्रमण करुन रस्ते अरुंद करुन टाकले आहे.आधीच शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अरुंद असून त्यात अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी अधिकच कमी झाली आहे.त्यामुळे दर तासाला शहरात वाहतुकीची कोंडी होते. पायी चालणाऱ्या लोकांना सुध्दा वाहतुकीच्या कोंडी फटका बसतो. शहरातील वाहतूक व्यवस्था आणि अतिक्रमणावर शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात होता.नगर परिषदेने यापूर्वी दोनदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र दोन्ही वेळा नगर परिषदेला ही मोहीम अर्ध्यावरच बंद करावी लागली होती.त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीमेवर शहरवासीयांचा सुध्दा विश्वास राहिला नाही.त्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शहरात मागील दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्ते काही प्रमाणात अतिक्रमण मुक्त झाले.मात्र गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, रेल्वे स्टेशन रोड, चांदणी चौक या परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण अद्यापही कायम आहे. पण हे अतिक्रमण सुध्दा सोमवारपासून काढण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:44 IST
शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शहरात शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. मागील दोन दिवस ही मोहीम शहरातील विविध भागात राबविण्यात आली.त्यानंतर सोमवारपासून (दि.१३) ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणार
ठळक मुद्देरस्त्यावरील पूर्ण अतिक्रमण काढणार : आजपासून पुन्हा मोहीम