शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

पक्षाच्या विकासकामांना जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 8:39 PM

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जवळपास चार हजार मतांनी गोंदिया शहरात मागे होता. तिच स्थिती नगराध्यक्ष व लोकसभा निवडणुकीत झाली. त्यावरून पक्षाचे संघटन गोंदिया शहरात कमी पडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : नगर काँग्रेस कमिटीची चिंतन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जवळपास चार हजार मतांनी गोंदिया शहरात मागे होता. तिच स्थिती नगराध्यक्ष व लोकसभा निवडणुकीत झाली. त्यावरून पक्षाचे संघटन गोंदिया शहरात कमी पडत असल्याचे चित्र आहे. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी येणाऱ्या मोठ्या लढाईसाठी तयार राहून बुथ स्तरावर काँग्रेसला मजबूत करा. तसेच पक्षाच्या विकासकामांना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपा-पीरिपा गटबंधनाच्या उमेदवारांना गोंदिया शहरात अपेक्षेपेक्षा कमी मतदान मिळाले. त्यामुळे गोंदिया नगर काँग्रेस कमिटीची विशेष आढावा सभा घेण्यात आली. यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.आ. अग्रवाल म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाजवळ कुशल नेतृत्व व मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या परिसरात नागरिकांच्या भेटी घेवून काँग्रेस पक्षाची निती व गोंदिया शहरात होणाºया विकासकामांना घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे. गोंदिया शहरातील सर्व १२० मतदान केंद्रांवर नवीन बुथ काँग्रेस कमिटींचे गठण करण्याचे निर्देश दिले.नगर काँग्रेस अध्यक्ष सुनील चौधरी म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे जवळपास २४०० मतांनी शहरात मागे राहिले. आ. अग्रवाल यांच्या नेतृत्वात शहरात नवीन उड्डान पूल, पाणी पुरवठा योजना, बायपास मार्ग, मेडीकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, तंत्रनिकेतन आदी अनेक विकासकामे झालीत. यानंतरही विधानसभा, नगराध्यक्ष निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीत पक्षाचे प्रदर्शन समाधानकारक नव्हते, यावर गंभीर चिंतन व प्रयत्न करण्याची गरज आहे. सुनील भालेराव यांनी, नागरिकांचे लक्ष पोटनिवडणुकीवर नव्हते. भाजप शासनाने जाणून मतदान यंत्र वेळेवर बंद केले. त्यामुळे मतदान प्रभावित झाले व सर्वाधिक नुकसान काँग्रेस पक्षाला सहन करावा लागले. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकदीने काम न केल्याने गोंदिया नगर परिषद क्षेत्रात काँग्रेस पक्ष पिछाडीवर राहिला.याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, गोंदिया-भंडारा काँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, नगर काँग्रेस अध्यक्ष अशोक चौधरी, न.प. बांधकाम सभापती शकील मंसुरी, नगरसेवक सुनील भालेराव, पराग अग्रवाल, मोंटू पुरोहित, देवा रूसे, भागवत मेश्राम, क्रांती जायस्वाल, कमल छपरिया, जहीर अहमद, शैलेश जायस्वाल, लक्ष्मीकांत डहाट, मौसमी बालाधरे, कनोजिया, चेतना पराते, मनोज पटनायक, सुनील तिवारी, नरेंद्र बिसेन, अमरचंद अग्रवाल, राजेश चौरसिया, महबूब भाई, राजू मिलये, अनिल शहारे, कुरमराज चव्हाण, अजय गौर, व्यंकट पाथरू, सुशील रहांगडाले, दिलीप गुप्ता, रवी रामटेककर, जग्गू वासनिक आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल