शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोग यशस्वी; गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्याने दीड एकर शेतीत घेतले चार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:29 IST

काही करण्याची जिद्द व चिकाटी असेल तर वयाची किंवा परिस्थिती बाधा आडवी येत नाही. हे सिद्ध करुन दाखविले आहे नवेगाव येथील ७० वर्षीय शेतकरी नोहरलाल पंचम दमाहे यांनी. त्यांनी दीड एकर शेतीत चार लाख रुपयांचे वांगी पिकाचे उत्पादन घेतले आहे.

ठळक मुद्देनोहरलाल दमाहे यांनी कोरोनाकाळात दिला अनेकांना रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: काही करण्याची जिद्द व चिकाटी असेल तर वयाची किंवा परिस्थिती बाधा आडवी येत नाही. हे सिद्ध करुन दाखविले आहे नवेगाव येथील ७० वर्षीय शेतकरी नोहरलाल पंचम दमाहे यांनी. त्यांनी दीड एकर शेतीत चार लाख रुपयांचे वांगी पिकाचे उत्पादन घेतले आहे.वाघनदीच्या किनाºयावर वसलेले नवेगाव हे गाव चवदार वांगी व इतर भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील निम्मे लोक नदी लगत जमिनीवर भाजीपाला उत्पादन घेवून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु नोहरलाल दमाहे नदीच्या किनाºयावर भाजीपाला पिकाची लागवड करण्याऐवजी धानपिक घेण्याच्या शेतीत वांगी उत्पादन घेवून सर्वांना आश्चर्य चकीत केलेले आहे. धानपिक घेण्यासंबंधी गुणाकार भागाकार केला तर दीड एकर शेतीत धान उत्पादनातून जेमतेम ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. त्यातच ३० हजार रुपायपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त लागवड खर्च येतो. त्यावर शेतकरी कुटुंबाने केलेल्या मेहनतीचा विचार केला तर हातात काहीच उरत नाही. या दृष्ट चक्रातून बाहेर निघण्याचा विचार करुन नोहरलाल दमाहे यांनी दीड एकर जमिनीत वांगी उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. प्रतिकुल वातावरण बघता अनेक वेळा असे वाटायचे की वांगी उत्पादनासाठी केलेली पैशाची गुंतवणूक जोखीमेची तर ठरणार नाही. परंतु दमाहे परिवाराची जीवापाड मेहनत वांगण्याच्या प्रत्येक झाडाची निगा राखणे, वेळेवर पाणी देणे, खत देणे, किटकनाशकाचा वापर करणे, यात कुठेही कमी पडू न देण्याचा निर्धार यामुळे प्रतिकुल वातावरणात सुद्धा वांगी उत्पादन वाढविले. ढगाळ वातावरणाचा फटका बसत मोठ्या प्रमाणावर वांग्यांना किडीचा प्रादुर्भाव सुद्धा झाला. परंतु यामुळे दमाहे कुटुंबीय क्वचित ही खचले नाही. आपल्या कुटुंबातील चार पाच लोक व इतर चार पाच लोक मिळून जवळपास दहा लोक सतत परिश्रम घेत असतात. यात काही झाडांची निगा करण्यात काही लोक वांगी तोडण्यात तर काही लोक विक्री करण्यात व्यस्त असतात.लॉकडाऊनचा फटकाकोरोनामुळे आठवडी बाजार बंद पडले आहेत. त्यामुळे वांग्याची मागणी मोठ्या प्रमाणात नाही. लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम रद्द झाले असल्याने फार मोठ्या प्रमाणात वांग्यांची मागणी नाही. कोरोना काळात गावा-गावात फेरीवाले भाजीपाला विक्री करीत आहे. असे फेरीवाले आपल्या क्षमतेनुसार वाडीवर येवून वांगी खरेदी करतात. तरी सुद्धा वांगी उत्पादन करणे, धानाच्या उत्पादनापेक्षा जास्त फायदेशीर आहे. हे दमाहे परिवाराने सिद्ध करुन दाखविले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती