शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या निर्मितीला पंचवीस वर्षांनंतरही जिल्ह्यासाठी स्वतंत्र कारागृह का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:20 IST

जमीन हस्तांतरणाला एक तप : पोलिस महासंचालक कार्यालयातच फाइल

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला २५ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही येथे स्वतंत्र कारागृह नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर, २०११ मध्ये गोंदियात कारागृह उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या. शासनाने २०११-१२ मध्ये 'वर्ग एक' श्रेणीच्या कारागृहाला मंजूरी दिली, मात्र अनुदान मागणीसाठीची फाइल पुढे सरकलीच नाही. स्वतंत्र कारागृहाअभावी जिल्ह्यातील आरोपींना ६० किमी दूर भंडारा कारागृहात हलवावे लागते.

भंडारा जिल्ह्याच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. महिन्याकाठी सुमारे १५० हून अधिक आरोपींना भंडारा येथील कारागृहात हलवावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तसेच वाहनांची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च वाढतो. गोंदियातील आरोपींना भंडारा येथे नेत असताना, कुणी आरोपी पसार होऊ नये किंवा आत्महत्येचा प्रयत्न करू नये यासाठी पोलिसांना विशेष दक्षता घ्यावी लागते. काही प्रकरणांमध्ये आरोपी पळून गेल्याने संबंधित पोलिस कर्मचारी निलंबित होण्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व अडचणींचा विचार करता गोंदियात स्वतंत्र कारागृहाची गरज आहे. 

शासनाने २०११-१२ मध्ये गोंदियात 'वर्ग एक' कारागृह उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर भंडारा जिल्हा कारागृह कार्यालयाने जागेच्या निवडीसाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, अधीक्षक बदलल्याने प्रस्ताव प्रलंबित राहिला. पुढे नवीन अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयाच्या नगररचना विभागाने गोंदियात कारागृह उभारण्यास मंजुरी दिली आणि जागा पाहण्याचे आदेश दिले. भंडारा कारागृह अधीक्षकांनी गोंदियातील पोलिस मुख्यालयाच्या मागील जागेची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार केला. मात्र, गेली १२ वर्षे हा आराखडा शासनाकडे गेलाच नसल्याची माहिती आहे. 

त्या संबंधात अंदाजपत्रक आराखडा तयार करून त्याला खर्च किती येणार याचा अहवाल शासनाने मागितला आहे. तो आराखडा तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. मात्र, १२ वर्षांपासून हा आराखडा शासनाकडे गेलाच नसल्याची माहिती आहे.

९.८५ हेक्टर आरमध्ये होणार बांधकामपोलिस मुख्यालयाच्या मागील भागात ९.८५ हेक्टर आरवर कारागृहासाठी जागा राखीव करण्यात आली.

आयजी ऑफिसमध्येच प्रस्ताव पडूनयेथील कारागृहाला १२ वर्षांपासून मंजुरी मिळाली असून, तो प्रस्ताव सध्या पोलिस महासंचालक कारागृह यांच्या कार्यालयात पडून आहे. तो प्रस्ताव शासनाकडे गेल्याशिवाय या कारागृहासाठी निधी मिळणार नाही.

५०० आरोपींची क्षमता असेलजिल्ह्यातील आरोपींना या कारागृहात ठेवण्यात येणार असून, ५०० कैदी ठेवण्याची क्षमता राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोपींना आता भंडारा कारागृहात नेण्याचा पोलिसांचा त्रास वाचण्यास मदत होईल.

१२ वर्षानंतर जागा हस्तांतरण सन २०११-१२ मध्ये मंजूर झालेल्या कारागृहासाठी जागा पाहण्यात आली. त्या कारागृहासाठी जागा निश्चित करण्यात आल्यानंतर ती जागा २०२४ मध्ये कारागृह विभागाला हस्तांतरित झाल्याचे भंडारा येथील कारागृह अधीक्षक देवराव आडे यांनी सांगितले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाjailतुरुंग