शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्त्री रुग्णालयात 'नॉर्मल' डिलिव्हरी, तर खासगी रुग्णालयात 'सिझेरियन'वर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 16:29 IST

गर्भधारणेनंतर घ्या संतुलित आहार : तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतींमध्ये नॉर्मल प्रसूती करण्यावर वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी भर दिला आहे. महिन्याकाठी होणाऱ्या ५५० वर प्रसूतींमध्ये ४०० वर प्रसूती नॉर्मल होतात. गर्भधारणेनंतर महिलांनी स्वतःचे आरोग्य व आहाराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे

तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित तपासणी, औषधोपचार आणि सकस आहार घेतला, तर प्रसूतीदरम्यान समस्या निर्माण होत नाहीत; परंतु अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रसूतीदरम्यान शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी माता आणि बालकांच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. 

सिझरचा सल्ला कधी दिला जातो? गर्भामध्ये बाळाचा दम कोंडणे, आईचा बीपी वाढणे, गर्भपिशवीच्या तोंडाला समस्या निर्माण होणे, पोटात शी करणे आदी कारणांनी सिझरचा सल्ला दिला जातो.

पहिली सिझेरियन, दुसरी नॉर्मल होते का?प्रसूतीवेळी महिलांमध्ये काही शारीरिक समस्या निर्माण झाल्या, तर माता आणि बालकाचे प्राण वाचविण्यासाठी सिझेरियन डिलिव्हरी करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो. प्रथम प्रसूतीवेळी सिझेरियन झाले असेल, तर दुसरी प्रसूती नॉर्मल होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांच्या जवळपास आहे; ; परंतु नंतरही प्रसूतीवेळी शारीरिक समस्या उद्भवल्या, तर सिझेरियन करावे लागते. 

प्रसूतीची आकडेवारी काय सांगते? महिना      नॉर्मल        सिझर         एकूण एप्रिल         ४१५           ९०                ५०५ मे              ४३८            ७८               ५१६ जून            ४०४           ८०                ४८४ जुलै           ३७८           ७०                ४४८ ऑगस्ट       ३५१           ६०                 ४११ सप्टेंबर        ४११           ९०                 ५०१

नॉर्मल प्रसूती करण्यावर अधिक भर "जिल्हा स्त्री रुग्णालयात अधिकाधिक महिलांची नॉर्मल प्रसूती व्हावी, याकडे लक्ष दिले जाते. शारीरिक समस्या निर्माण झाल्या तर सिझेरियन करावे लागते. या सिझेरियनची गरज उद्भवू नये, यासाठी गर्भधारणेनंतर महिलांनी आवश्यक दक्षता घ्यावी."- डॉ. निकीता पोयाम, अधीक्षक, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाHealthआरोग्य