शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

शहरासह ग्रामीण भागात हत्तीरोग निर्मूलन अभियान

By admin | Updated: December 10, 2014 22:59 IST

राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीम १४ डिसेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. ग्रामीण भागात १६ डिसेंबरपर्यंत व शहरी भागात १८ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

१,७७४ कर्मचारी : ४६ लाख ८४ हजार गोळ्यांचे होणार वाटप
गोंदिया : राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीम १४ डिसेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. ग्रामीण भागात १६ डिसेंबरपर्यंत व शहरी भागात १८ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी हरीश कळमकर व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सलील पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सदर माहिती दिली.
जिल्ह्यात १३ लाख ६१ हजार ३८६ नागरिकांपैकी १२ लाख ६८ हजार ९४१ लोकांना डीईसी व एल्बेंडाजोल गोळ्या या मोहिमेदरम्यान वाटप करण्यात येतील. यात गोंदिया तालुक्यात दोन लाख ६२ हजार ३३९, तिरोडा तालुक्यात एक लाख ३७ हजार ०५५, आमगाव तालुक्यात एक लाख २४ हजार ६३२, गोरेगाव तालुक्यात एक लाख २१ हजार ७१०, देवरी तालुक्यात एक लाख आठ हजार ६३५, सडक/अर्जुनी तालुक्यात एक लाख आठ हजार २२६, सालेकसा तालुक्यात ८४ हजार १८० व अर्जुनी/मोरगाव तालुक्यात एक लाख ३८ हजार ८७३ व शहरी क्षेत्रात एक लाख ८३ हजार २९१ नागरिकांना सदर गोळ्या चारण्यात येणार आहेत. यासाठी ३३ लाख ९९ हजार ६४५ डीईसी व १२ लाख ८४ हजार ४४० एल्बेंडाजोल गोळ्यांची गरज जिल्हा हिवताप विभागाला आहे.
गोळ्यांच्या वितरणासाठी एक हजार ६८१ कर्मचाऱ्यांना कामावर लावण्यात येत आहे. तसेच सुपरवायजर म्हणून ९३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात एक हजार ५४८ कर्मचारी व ८६ पर्यवेक्षक ग्रामीण क्षेत्र तसेच १३३ कर्मचारी व सात पर्यवेक्षक शहरी क्षेत्रात काम करणार आहेत.
नागपूरची एक चमू रात्रीच्या वेळी काही निवडक ठिकाणांवर सर्व्हेक्षण करते. हे सर्व्हेक्षण गोंदिया शहरातील वाजपेयी वॉर्ड, रावणवाडी आरोग्य केंद्रांतर्गत चांदनीटोला, कटंगटोला, भानपूर आरोग्य केंद्रांतर्गत लोधीटोला, एकोडी आरोग्य केंद्रांतर्गत ओझीटोला व खर्रा येथे करण्यात आले. यात वाजपेयी वार्डात १०, कटंगटोला येथे एक, लोधीटोला येथे नऊ, ओझीटोला येथे चार व खर्रा येथे पाच अशाप्रकारे २९ हत्तीपाय रूग्ण आढळले. दवनीवाडा आरोग्य केंद्रांतर्गत रतनारा येथे चार, कवलेवाडा आरोग्य केंद्रांतर्गत चिचगाव येथे सहा, तिरोड्याच्या भूतनाथ वार्डात चार व चान्ना बाक्टी आरोग्य केंद्रांतर्गत येरंडी येथे एक हत्तीपाय रूग्ण आढळला. (प्रतिनिधी)