शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'डिजीलॉकर'मध्ये आता मिळणार विजेची बिले; कसे उपलब्ध होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:03 IST

लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन : ५२ कोटी जणांकडून डिजीलॉकरचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी हल्ली सर्वजण डिजीलॉकर या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेतात. आता या डिजीलॉकरमध्ये महावितरणने ग्राहकांसाठी वीजबिलेही उपलब्ध करून दिली आहेत. या सुविधेचा लाभ वीज ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. या सुविधेमुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाइल फोनमध्ये डिजीलॉकर अॅपमध्ये महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच विजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. 

डिजीलॉकरमध्ये कसे वीजबिल उपलब्ध होईलवीज ग्राहकांनी आपल्या डिजीलॉकर अॅपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करावी, यामध्ये वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्यांना आपल्या डिजीलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल. 

डिजीलॉकर केंद्र सरकारचा महत्त्वाचा उपक्रमडिजीलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला उपक्रम आहे. याद्वारे वापरकर्ते आपले पॅनकार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशनकार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज अॅपमध्ये सुरक्षित ठेवू शकतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो.

डिजीलॉकरमध्ये ८५९ कोटी कागदपत्रे सुरक्षितदेशात आतापर्यंत ५२ कोटी ८९ लाख नागरिकांनी डिजीलॉकरचा वापर सुरू केला असून, त्यांनी त्यात ८५९ कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती-तंत्रज्ञान कायदा २०००च्या नियमावलीनुसार डिजीलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा असल्याची माहिती आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाelectricityवीज