लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : विद्युत धक्क्याने चितळाची शिकार करणाऱ्या आठ आरोपीना आमगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री आमगाव वन परिक्षेत्राच्या कुंभारटोली बीट क्रमांक १०८० मध्ये करण्यात आली.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये कुंभारटोली रहिवासी कुणाल राजेश साखरे (२०), राजू भैयालाल मरकाम (२५), राहुल मधू पाऊलझगडे (२९), सुरेश धनराज राऊत (२८), व्यंकट दशरथ परसमोडे (३५), बिरसी रहिवासी नरेश यादोराव रहांगडाले (३६), देवेंद्र बाबुलाल चौधरी (३६) आणि रामेश्वर बिरराम बिसेन (५०) यांचा समावेश आहे.तर दोन आरोपी फरार असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार मागील काही दिवसांपासून आमगाव आणि सालेकसा जंगल परिसरात विद्युत करंट लावून वन्यप्राण्यांच्या शिकार करणारी टोळी सक्रीय असल्याची ओरड सुरू होती.दरम्यान बुधवारी रात्री आमगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कुंभारटोली परिसरात विद्युत करंट लावून चितळाची शिकार करण्यात आली असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभारटोली येथे धाड टाकून चितळाचे मांस व साहित्य जप्त करुन आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी वन विभागाने सदर आरोपींवर गुरूवारी वन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.टोळी सक्रीय असल्यावर शिकामोर्तबगोंदिया जिल्ह्यात जंगलामध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित करुन वन्य प्राण्यांची मोठी टोळी सक्रीय असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. तर आमगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी विद्युत प्रवाहित करुन चितळाची शिकार करणाऱ्या आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे विद्युत प्रवाहित करुन वन्यप्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रीय असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
चितळाची शिकार करणारे आठ जण जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST
बुधवारी रात्री आमगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कुंभारटोली परिसरात विद्युत करंट लावून चितळाची शिकार करण्यात आली असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभारटोली येथे धाड टाकून चितळाचे मांस व साहित्य जप्त करुन आरोपींना ताब्यात घेतले.
चितळाची शिकार करणारे आठ जण जाळ्यात
ठळक मुद्देवन विभागाची कारवाई : दोन फरार आरोपींचा शोध सुरू