शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात आठ पोलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:14 IST

गोंदिया शहरातील अवैध व्यावसायिकांना अभय देणाऱ्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी गुरूवारी (दि.६़) रात्री उशिरा निलंबनाची कारवाई केली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची कारवाईअवैध धंद्यांना अभय देणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील अवैध व्यावसायिकांना अभय देणाऱ्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी गुरूवारी (दि.६़) रात्री उशिरा निलंबनाची कारवाई केली. रामनगर पोलीस ठाण्यांत कार्यरत चार तर गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.गोंदिया शहरात जुगार अड्डे, दारू, सट्टापट्टी व इतर अवैध धंदे सुरू आहेत. परंतु शहरातील पोलीस शिपाई अवैध व्यावसायिकांना अभय देत असून कारवाई करण्याकरीता टाळटाळ करीत असल्याच्या तक्रारी होत्या. या आठ पोलिस शिपायांना पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी निलंबित केले आहे. रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत बीट क्र. २ येथील पोलीस हवालदार कृष्णराम खेमराज ठाकरे बक्कल क्र.२९८, प्रितमकुमार खामले बक्कल क्र.७५१, अनिल पारधी बक्कल क्र. ६७१, हिरादास पिल्लारे बक्कल क्र. ५३०, गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील बीट क्र.१ छोटा गोंदियाचे बीट जमादार पोलीस हवालदार सुरेश मेश्राम बक्कल क्र. ७१२, बीट क्र. २ सराफा लाईनचे बीट जमादार सहाय्यक फौजदार मारोती गोमासे बक्कल क्र. ४२५, राजानंद वासनिक बक्कल क्र. ७५५ व बीट क्र.३ गणेशनगर सांभाळणारे पोलीस हवालदार इंदल आडे बक्कल क्र. ४८५ यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान पोलीस अधिक्षकांच्या धडक कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.तपास उशीरा करणारे दोन कर्मचारी निलंबितआमगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नायक शिपाई कुलदीप कोहळे बक्कल क्र.२५२ याने एका चोरीच्या प्रकरणाचा तपास १४ महिने न करता प्रकरण स्व:कडे ठेवले. पोलीस गणवेश न घालणे किंवा अन्य कामात अनागोंदी कारभार करीत असल्याच्या तक्रारी होत्या. याप्रकरणी ठाणेदारांनी हटकले असता त्यांनाच धमकी दिली. त्यामुळे त्याला ३० आॅगस्टला निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय कारंजा देण्यात आले आहे.प्रशिक्षणात कॉपी करणारा शिपाई निलंबितगोंदिया जिल्हा पोलीस दलात नवप्रविष्ठ पोलीस शिपाई विजय नशीने बक्कल क्र. १२४ याला ९ ते १६ जुलै २०१८ दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान या परीक्षेत विजय नशीने कॉपी करताना आढळला. त्यामुळे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या आदेशान्वये त्याला निलंबित करण्यात आले.

टॅग्स :suspensionनिलंबनPoliceपोलिस