शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

उष्माघातासाठी प्रत्येक पीएचसीत ‘कोल्ड रूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:47 IST

उन्हाळा आता आपल्या रंगात येत आहे. रविराज आग ओकू लागल्याने तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कोल्ड रूम (वातानुकुलीत कक्ष) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देमागील वर्षी उष्माघाताचे १६ रूग्ण : केटीएसमध्ये अतिदक्षता कक्षाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता आपल्या रंगात येत आहे. रविराज आग ओकू लागल्याने तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कोल्ड रूम (वातानुकुलीत कक्ष) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रकारे, येथील वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. सहा बेडची व्यवस्था असलेले हे कक्ष आवश्यक असलेल्या सर्व सुविधांनी सज्ज आहे.उन्हाळ््यात उष्माघाताची समस्या नेहमीच गंभीर रूप धारण करते. उष्माघाताने जीव जाण्याचा धोका नसला तरिही वेळीच उपचार व आवश्यकती काळजी न घेतल्यास उष्माघाताने जीवही जातो. हे प्रकार जिल्ह्यातही घडतात. जिल्ह्याचे तापमान उन्हाळ््यात ४७ डिग्री पर्यंत गेल्याचीही नोंद आहे. त्यामुळे उन्हाळा म्हटला की, गोंदिया सर्वाधीक तापमान असलेल्या शहरांच्या यादीत हमखास दरवर्षी दिसून येतो.यंदाही आतापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. सुर्यदेव आता कोपू लागल्याने तापमानात झपाट्याने वाढ होत असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. आताच्या स्थितीत जिल्ह्याचे तापमान ४२ अंशाच्या वर गेले असून उन्हाची तिरीप बघताच घाम फुटू लागतो. वाढत्या उन्हामुळे जीव कासावीस होऊ लागला आहे. वाढत्या तापमानाच्या या पाशातून मुक्तता शक्य नाही व येथेच येवून उष्माघाताची शक्यता बळावते. यामुळेच आरोग्य विभागाने वाढत्या उन्हाळ््याचे चित्र बघता उष्माघाताच्या या समस्येवर तोडगा म्हणून पाऊल उचलले आहेत.यांतर्गत, येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात विशेष उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. सहा बेड असलेल्या या कक्षात औषध, कक्ष थंड ठेवण्यासाठी कुलर व डॉक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास अतिदक्षता विभागही उपलब्ध करवून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी दिली.मागील वर्षी ४७ डिग्रीजिल्ह्यातील तापमान उन्हाळ्यात ४७ डिग्रीपर्यंत जाते. मात्र आश्चर्याची बाब अशी की, आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार १९ मे २०१५ रोजी गोंदियाचे तापमान ४८ डिग्री एवढे होते. यातून देशातील अतिउष्ण शहरांच्या यादीत गोंदियाची नोंदणी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले हे तापमान बघता आतापासूनच जास्तीतजास्त वृक्षारोपण व पाण्याचा अपव्यय टाळण्यास सुरूवात करणे हितावह ठरणार आहे. मागील वर्षीचे सर्वाधीक तापमान ४७ डिग्री होते.डॉक्टर्सना दिले प्रशिक्षणउष्माघातावर काय करावे व काय नाही याबाबत रूग्णालयातील डॉक्टर्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रूग्णालयात उष्माघाताचे रूग्ण आल्यास डॉक्टर्सही सज्ज असावे या दृष्टीकोणातून आरोग्य विभागाने हे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे उष्माघाताच्या या समस्येला घेऊन आरोग्य विभाग आतापासूनच चौकस असून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.मागील वर्षी १६ जणांना उष्माघातउष्माघाताची लक्षणे असलेल्या व्यक्तीला अस्वस्थपणा व थकवा जाणवतो. शरीर तापू लागते, अशक्तपणा व मळमळ येऊन अंग व डोकेदुखी होते. अशा वेळेस थंड जागेत व थंड वातावरणात रहावे, लहान मुले-मुली, वृद्ध व्यक्ती व गरोदर माता यांची विशेष काळजी घ्यावी. मागील वर्षी जिल्ह्यात १६ जणांना उष्माघात झाल्याचे आढळले आहे.तहान लागलेली असो किंवा नाही भरपूर थंड पाणी प्यावे. सैल व फिकट रंगाचे कपडे घालवे, कापडाने डोके झाकावे, थंड पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी. भर दुपारी उन्हात काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.-डॉ. भुमेश्वर पटलेजिल्हा साथरोग अधिकारी, जि.प. गोंदिया.

टॅग्स :Healthआरोग्यweatherहवामान