शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

चालक, वाहक म्हणतात मुंबईची ड्यूटी नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक- वाहकांना मुंबईला पाठविण्याचा आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी या बेस्टबस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून, अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात गोंदिया आगाराला आदेश प्राप्त झाला नाही. मात्र, असा आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई येथील आदेश निघणार असल्याच्या माहितीने कर्मचारी संघटनेमध्ये चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देगोंदिया आगाराला आदेश नाही : तरिही मुंबईचे नाव ऐकताच नाही बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्टसेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या विविध विभागांतील चालक- वाहकांना मुंबई बेस्टसेवेसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील अनेक चालक- वाहक मुंबईची ड्यूटी नको रे बाबा, असे म्हणत नकार देत आहेत.   सुदैवाने गोंदिया आगारातील एकाही चालक, वाहकाची गतवर्षी  मुंबई येथील बेस्ट बससेवेसाठी ड्यूटी लागली नव्हती. राज्यातील महामंडळाच्या इतर विभागांतील पुणे, सातारा, कोल्हापूर, धुळे, नांदेड, लातूर, जालना, तसेच विदर्भातील अमरावती, अकोला असे इतर जिल्ह्यांतील अनेक चालक- वाहकांची मुंबई बेस्टसेवेसाठी ड्यूटी लागली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक- वाहकांना मुंबईला पाठविण्याचा आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी या बेस्टबस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून, अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात गोंदिया आगाराला आदेश प्राप्त झाला नाही. मात्र, असा आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई येथील आदेश निघणार असल्याच्या माहितीने कर्मचारी संघटनेमध्ये चर्चा सुरू आहे. आजही एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह शासनाच्या इतर सुविधा मिळत नसल्याने कर्मचारी संतप्त आहेत. त्यातच शासनाने मुंबई येथील बससेवेसाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्याचा आदेश दिल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारीही शासनाने घेण्याची गरज आहे. यासोबतच चालक, वाहकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यानंतरही कर्मचारी मात्र मुंबईचे नाव ऐकताच नाहीच म्हणत आहेत.

यावर्षी अद्यापतरी कर्मचाऱ्यांना पाठविण्याचे आदेश नाही

परराज्यातील मजुरांना सोडताना झाला होता त्रासमुंबईला कर्तव्यासाठी गेल्यावर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे अनेक जण मुंबईची ड्यूटी नको रे बाबा, असे म्हणू लागले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांतील ज्या एसटीच्या चालक- वाहकांनी मुंबईला बेस्टसेवेसाठी कर्तव्य निभावले त्यातील अनेकांना कोरोनाने ग्रासले होते. आजही त्यांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.

सुदैवाने जिल्ह्यातील एकाचीही मुंबईला ड्यूटी लागलीच नाही मागील लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी स्थलांतरित परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी कर्तव्य निभावले होते. यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्यापासून घरी पोहोचेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मात्र, सुदैवाने जिल्ह्यातील एकाही चालक- वाहकाला मुंबई येथील बेस्टसेवेसाठी कर्तव्य निभावण्यासाठी जावेच लागले नसल्याने कर्मचारी निश्चिंत होते. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून विविध विभागांतील चालक- वाहकांची नावे मागविण्यात येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे.

चालक-वाहकांच्या  प्रतिक्रिया

एकीकडे सरकार मुंबईला कर्तव्यासाठी बोलावत आहे; पण दुसरीकडे त्याच चालक- वाहकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांची जबाबदारी एसटी किंवा शासन घेत नाही. शिवाय मृतांच्या  कुटुंबीयांना नुकसानभरपाईही मिळत नसल्याने शासनाने चालक- वाहकांचा  विचार करण्याची गरज आहे.  - वाहक, गोंदिया आगार

गतवर्षी कोरोनाकाळात इतर राज्यांतील मजुरांना सोडण्याचे कर्तव्य निभावले. सुदैवाने मुंबईला जावे लागले नाही. मात्र, आता वय वाढत चालल्याने कोरोनाच्या संसर्गाची भीती वाटत आहे. ५० व यापुढील कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवू नये, अशी आमची चालक- वाहक संघटनेची शासनाकडे मागणी आहे.                  -चालक, गोंदिया आगार

 

टॅग्स :state transportएसटीBESTबेस्ट