लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : जिल्ह्यात मागील तीन संततधार बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथील साझा क्रमांक ६ व ७ मध्ये घरांची पडझड झाली आहे. यात लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी केली जात आहे.संततधार पावसामुळे महसूल मंडळातील साझा क्रमांक ७ मधील ग्राम कवठा येथील दादाजी काशिराम कांबळे यांचे घर अंशत पडले असून त्यात २० हजार रूपयांचे, राधेश्याम इंद्रराज मेश्राम यांचे १५ हजार रूपयांचे, येरंडी येथील अनुसया उद्धव गेडाम यांचे १० हजार रूपयांचे, देवलगाव येथील तुकाराम धोंडू गजबे यांचे १५ हजार रूपयांचे, लहानु रंगारी यांचे १५ हजार रूपयांचे, तेजराम सोनवाने यांचे ५ हजार रूपयांचे व रमेश गेडाम यांचेही घर अंशत: पडले असून त्यांचे ५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर यांच्या घरांची स्थिती अत्यंत जर्जर झाली आहे.साझा क्रमांक ७ मधील घरांचा तलाठी लालेश्वर टेंभरे व साझा क्रमांक ६ मधील घरांचा तलाठी प्रवीण ताकसांडे यांनी पंचनामा केला आहे.झालेल्या नुकसानीची शासनाने लवकरात लवकर भरपाई द्यावी जेणे तकरून घरांची दुरूस्त करता येईल अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून केली जात आहे.
संततधार पावसाने घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:17 IST